बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे पक्षांतर करणार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10529*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

218

बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे पक्षांतर करणार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर –बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या निवासस्थानी त्यांचे हितचिंतक व बसपाचे कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. साखरेनी मागील आठवणी काढत मला राष्ट्रीय पातळीवर कार्य करण्याची संधी मला पक्षाने दिली आणि ती जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पडली. याप्रसंगी सुरेश साखरेंनी बहुजन समाज पार्टीत प्रवेश करणार असे मत कार्यकर्तेयांन समोर व्यक्त केले. बहुजन समाज पार्टी हा पक्ष फक्त नागपुरातच राष्ट्रीय पक्ष म्हणून राहिलेला आहे. बसपा मध्ये सुरेश साखरे यांनी आपले आयुष्य पस्तीस वर्षे घालवली. पक्षाला माझी गरज असेल तर मी कधीही मोकळा आहे असे व्यक्त केले. बहुजन समाजाला सोबत घेऊनच चालणाऱ्या पक्षातच मी जाणार आहे. आणि पक्षांच्या नेत्यांची चर्चा करून पक्षांतर करणार असे सुरेश साखरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.