Home Breaking News बारामती सहकारीसह महाराष्ट्रातील ३ बँकांना आरबीआयचा २३ लाख दंड

बारामती सहकारीसह महाराष्ट्रातील ३ बँकांना आरबीआयचा २३ लाख दंड

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10519*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

57 views
0

बारामती सहकारीसह महाराष्ट्रातील ३ बँकांना आरबीआयचा २३ लाख दंड

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई- नियमांचे पालन केले नाही म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील बारामती सहकारी बँक लिमिटेड, इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या ३ बँकांना २३ लाखांचा दंड ठोठावला आहे.

मुंबईतील मोगावीरा सहकारी बँकेने ठेवींची खाती व्यवस्थित ठेवली नव्हती. याशिवाय केवायसीतही गोंधळ होता. या बाबी आरबीआयने केलेल्या इन्स्पेक्शनमध्ये उघड झाल्या. त्यामुळे या बँकेला आरबीआयने सर्वाधिक म्हणजे १२ लाखांचा दंड ठोठावला आहे. कोणती खाती नियमित ऑपरेट केली जातात आणि कोणती नाही याचा आढावा दर वर्षी बँकांना घ्यावा लागतो. तसा आढावा या बँकेने घेतला नसल्याचे तपासणीत उघड झाले आहे. पुण्याच्या इंदापूर अर्बन सहकारी बँकेलाही आरबीआयने १० लाखांचा दंड ठोठावला आहे. त्यांनी ३१ मार्च २०१९ पर्यंत अनसेक्युर्ड सिलिंगचे पालन केले नाही. याशिवाय ज्यादा जोखमीच्या खात्यांचा आढावा घेतला नाही. त्यामुळे त्यांना १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बारामती सहकारी बँकेला १ लाखांचा दंड ठोठावला आहे. या बँकेने अन्य बॅंकांसोबतच्या देवाण-घेवाणीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आरबीआयच्या तपासणीत आढळले आहे. त्यामुळे त्यांना हा दंड ठोठावला आहे.