विदर्भ फार्मसी असोसिएशन तर्फे आॅनलाइन योग दिवस संपन्न

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10508*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

138

विदर्भ फार्मसी असोसिएशन तर्फे आॅनलाइन योग दिवस संपन्न

विदर्भ वतन, नागपूर : विदर्भ फार्मसी असोसिएशन व तायवाडे इन्स्टिट्यूट आॅफ डिप्लोमा इन फार्मसी द्वारा आयोजित 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस यशस्वीपणे संपन्न झाले. विदर्भ फार्मसी असोसिएशन व तायवाडे इन्स्टिट्यूट आॅफ डिप्लोमा इन फार्मसीच्या वतीने सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस, भारतसरकारच्या, आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉलनुसार आयोजित करून कार्यक्रमाचे आॅनलाइन योगा प्रात्यक्षिक व प्राणायामचे थेट प्रेक्षपण करून जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे हरिश गणेशांनी, कार्यक्रमाचे अध्यक्ष तायवाडे कॉलेज आॅफ फार्मसीचे प्राचार्य चंद्रशेखर डोईफोडे, विशेष अतिथी तायवाडे डिप्लोमा इन फार्मसीचे प्राचार्य विक्रांत चिलाटे, विदर्भ फार्मसी असोसिएशनचे अभिजीत दरवडे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक निखिल भुते व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. योग साधक व नागरिकांना आयुर्वेदिक काढा आणि निरोगी रहाण्याची माहिती मान्यवरांनी दिली. देशभरात कोविंद विषाणूचा वाढता प्रभाव पहाता. घरातील योग, ही थिम घरातील कुटुंबासमवेत, विश्व योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी योग व प्राणायमचे प्रात्यक्षिक संचालन पतंजलि युवा भारत प्रभारी पंकज बांते यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन मिनल भोयर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखिल भुते, आभार प्रदर्शन शरद भांडारकर यांनी केले, कार्यक्रम यशस्वीरित्या प्रिती भोयर, पराग जुवारकर, आदिल शेख, प्रफुल नावंगे, आचल मेश्राम, उर्मिला जुवारकर यांनी अथक परिश्रम घेतले.