शंभू राजे (अभंग)

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10490*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

125

शंभू राजे (अभंग)

जन्मे पुरंदरी ।राणीच्या उदरी ।
सईबाई घरी।राजे शंभू ।।
रक्षक राज्याचे ।भक्षक शत्रूंचे ।
पुत्र शिवबांचे ।धर्मवीर ।।
आईचे निधन ।जिजाऊ पालन ।
उमाजी शिक्षण । गुरू लाभे ।।
दिल्ली ही हादरे ।शत्रू थरथरे ।
मुघल घाबरे । शिव पुत्रा ।।
बोल रोख ठोक।शत्रू झाले कैक।
कापले कित्येक ।फितुरही ।।
राज्य कारभार । करण्या हुशार ।
नेले बरोबर । भेटीसाठी ।।
वाटा तो सिंहाचा।आग्रा सुटकेचा।
तल्लख बुद्धीचा । बाल छावा ।।
शत्रू चाल मोठी । ती मगर मिठी ।
त्यांनी केली खोटी ।औरंग्याची ।।
शिव शंभू छावा । राजा मिळे नवा ।
सर्वांनाच हेवा । या पुत्राचा ।।
श्री.युवराज गोवर्धन जगताप
     काटेगाव ता:- बार्शी
     जिल्हा:- सोलापूर
   9405237081