शिवसेना विभाग प्रमुख विशाल कोरके तर्फे तसेच वाहतुक सेनेच्या सहकार्याने प्रभाग २९ येथे वृक्षारोपण व वृक्षवाटप

247

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – शिवसेना वर्धापन दिनाच्या औचित्याने शिवसेना व महाराष्ट्र वाहतूक सेना तर्फे दक्षिण नागपुर प्रभाग २९ मधे वृक्षारोपण व वृक्षवाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागपुर शहर संपर्क प्रमुख तसेच आमदार दुष्यंत चतुर्वेदी व जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्या मार्गदर्शनात शहर प्रमुख दीपक कापसे, नितीन तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व वाहतुकसेना जिल्हा प्रमुख नितिन नायक, शिवसेना शहर सचिव मुन्ना तिवारी, शहर प्रमुख अतुल काटकर, उपशहर प्रमुख रुपेशजी बुराडे, महादेव कुहिटे, उपशहर प्रमुख मुकेश रेवतकर यांच्या सहकार्यांने विभाग प्रमुख विशाल कोरके यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक 29 मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम व वृक्षवाटप करण्यात आले़ त्याचप्रमाणे स्वातंत्र संग्राम कॉलोनी, रामभाऊ म्हाळगी नगर, अष्टविनायक कॉलोनी, महात्मा गांधी नगर, संभाजी नगर या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून ५५५ वृक्ष वाटप कुंडीसह नागरिकांना देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना व वाहतुक सेना द्वारे करण्यात आले.
कार्यक्रम योग्यरित्या पार पाळण्याकरीता सहकार्य केल्याबद्दल सर्व महिला व शिवसैनिकांºयांचे विशाल कोरके यांनी आभार मानले़
याप्रसंगी उपस्थित किरण शेळके, प्रभाग प्रमुख श्रीकांत खंडाळे, शाखा प्रमुख निलेश डहाके, आशिष भोयर, कार्तिक नारनवरे, अर्चना दिलीप लांजेवार, पुष्पा राजेश रणनवरे, मनिष चोपडे, अनिरुद्ध बनसोड, गौरव तिजारे, नितिन जुमळे, शिवसैनिक अंकुश सदावर्ती, निखिल गाणार, विकास पांडे, कुणाल कानपिल्लेवार, पुनीत, नीलेश नायक, सचिन,अभिजीत मंडपे, यश भागवतकर, हर्ष खोंगल, प्रशांत बोथले, रोशन उइके, रमेश पवार उपस्थित होते़