Home नागपूर “पीपल टू पीपल” सोसायटीच्या वतीने किन्नरांना मदत

“पीपल टू पीपल” सोसायटीच्या वतीने किन्नरांना मदत

0
“पीपल टू पीपल” सोसायटीच्या वतीने किन्नरांना मदत

“पीपल टू पीपल” सोसायटीच्या वतीने किन्नरांना मदत

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर – कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान रस्त्यावरील गरजू व गरिबांना आज पर्यंत पीपल पीपल सोसायटी मदती ला धावून आली तसेच अनेकांना मदत करण्यात आली. ॲम्बुलन्सची मदत, औषधे घेण्याकरिता आर्थिक मदत, आजारी रुग्णांना फळे देणे, आर्थिक मागासवर्गीयांना आर्थिक मदत करणे, गेल्या दोन महिन्यापासून सोसायटीने भोजन वाटपही केल्या गेले.

अशा विभिन्न प्रकारे अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्यात आली. लॉकडाऊन दरम्यान किन्नर समूहांना भयंकर हाल अपेष्टा सहन करावे लागल्या. कारण त्यांचे दररोज चे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे त्यांना किराणा पासून ते घरभाडे आणि इलेक्ट्रिक बिल भरणे हे अतिशय कठीण झाले होते. म्हणून याकठीण कालावधीत पीपल टू पीपल सोसायटीच्या अध्यक्षा अनुश्री ख्रोब्रागडे व त्यांच्या चमूने शनया किन्नर ला व 16 किन्नरांच्या ग्रुपला किराणा किट, इलेक्ट्रिक बिल भरण्यास आर्थिक मदत केलेली आहे. यामध्ये हे कार्य करतांना धम्मचारी तेज धम्म, अनुश्री खोब्रागडे, सुषमा नागरे कांबळे कृष्णा आणि अन्य कार्यकर्ते सहभागी होते.