निरोगी आणि स्वस्थ जीवनशैलीसाठी नियमित योगासन आणि प्राणायामाचा संकल्प करा – केंद्रीय मंत्री गडकरी 

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10459*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

158

निरोगी आणि स्वस्थ जीवनशैलीसाठी नियमित योगासन आणि प्राणायामाचा संकल्प करा – केंद्रीय मंत्री गडकरी 

नागपुरातील जुने उच्च न्यायालय परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर-‘प्रत्येक भारतीय नागरिकाने निरोगी आणि स्वस्थ जीवनशैली करीता नियमितपणे प्राणायाम आणि  योगासने  करावीत. माझ्या स्वत:च्या आरोग्यामध्ये प्राणायाम आणि योगासनामुळे सुधारणा  झाली आहे. करोनातून बरे झालेल्यांनीदेखील योगासने व व्यायाम करून स्वत:ला स्वस्थ आणि सुदृढ ठेवावे’ , असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग मंत्री  आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी यांनी आज  केले. केंद्रीय  संस्कृती  मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि दक्षिण मध्य क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र यांच्या तर्फे   नागपुरात 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस  सिवील लाईन्स स्थित  जुने उच्च न्यायालय परिसरात साजरा करण्यात आला , त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून  ते बोलत होते.  याप्रसंगी दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या उपसंचालक गौरी मराठे आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नागपूरच्या अ‍धिक्षक नंदिनी भट्टाचार्य साहू, प्रामुख्याने उपस्थित होत्या.

याप्रसंगी  भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र यांच्या अधिकारी आणि कर्मचा-यासोबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी योगासनाचे  विविध  प्रात्याक्षिक केले.

योगासनानंतर दक्षिण मध्य  क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीने एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात मल्लखांब  आणि शिवकालीन युद्धाचे प्रकार , दाडपंट्टा याचे  नागपूरच्या कलावंतांनी  सादरीकरण केले.  मल्लखांब यांचे सादरीकरण डॉ . संभाजी भोसले व  चमू  यांनी केले आणि शिवकालीन  युद्‌ध कलाचे सादरीकरण  राहुल धर्मिक व  चमूने केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी  ओल्ड हायकोर्ट  परिसरात वृक्षारोपणही    केले .

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रभारी व केंद्राचे वरिष्ठ अधिकारी दीपक पाटील  यांनी केले.