पीकविमा कंपनी द्वारा शेतक-यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी “आप”चे नागपुरतील आमदारांना निवेदन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10454*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

144

पीकविमा कंपनी द्वारा शेतक-यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी
“आप”चे नागपुरतील आमदारांना निवेदन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपुर : खरीप हंगाम २०२०-२१ मधील पिक विमा काढलेल्या शेतक-यांना संबंधित विमा कंपनी कडून नुकसान भरपाई (परतावा) मिळण्याबाबत सोमवारी आम आदमी पार्टी तर्फे सहा विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदारांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आले.

खरीप हंगाम २०२०-२१ ला शेतक?्यांनी खरिप पिकांच्या विमा हप्त्याची रक्कम भरली होती. याच हंगामात पिक काढणीच्या वेळी अतिवृष्टी झाली, त्यामुळे सरकारनं पंचनामे करून थोड्या प्रमाणात नुकसान भरपाई देखील दिली.ज्याअर्थी सरकारने नुकसान भरपाई दिली त्याअर्थी शेतक-यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे हा पुरावा आहे, असे असून देखील विमा कंपनीने पिकाची नुकसान भरपाई (परतावा) अजूनही शेतक-यांना दिलेला नाही.
विमा कंपनीने नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर पंचनामे करून नुकसानभरपाई देणे बंधनकारक आहे, परंतु विमा कंपनी पंचनामे पूर्ण करू शकली नाही.


त्यामुळे कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी ५ मार्च २०२१ रोजी एक परिपत्रक म्हणजेच आदेश जाहीर केला, त्यात त्यांनी नमूद केले कि जर विमा कंपनी पंचनामे करण्यास असफल ठरली असेल, तर सरकारने केलेले पंचनामे ग्राह्य धरुन शेतक-यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी.
असा आदेश असून देखील विमा कंपनी या आदेशानुसार कारवाई करण्यास राजी होतांना दिसत नाही तसेच कृषी विभाग मध्यस्थी असल्यामुळेच आम्ही शेतकरी प्रत्यक्ष विमा कंपनीला जाब विचारु शकत नाही. त्यामुळे आम्हाला विमा कंपनी कडून पिकांची नुकसान भरपाई (परतावा) मिळवून देण्याची सर्वस्वी जबाबदारी ही कृषी विभाग म्हणजेच सरकारची आहे.
विमा परतावा मिळण्यास विलंब लागत असल्यामुळे सरकारचं आणि विमा कंपन्यांचं साटंलोटं आहे की काय, असा संभ्रम शेतक-यांमध्ये निर्माण झाला आहे.
प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये त्या त्या विधानसभा क्षेत्रातील संयोजकांच्या नेतृत्वाखाली निवेदने सादर करण्यात आली.
दक्षिण विधानसभा क्षेत्रातील आमदार मोहन मते यांना डॉ श्री जाफरी व श्री सुरेन्द्र समुद्रे यांच्या नेतृत्वात, श्रीमती अर्चना शेमबेकर, श्रीमती रोशनी बांबल, श्री विक्की शंभरकर, श्री संजय अनासाने, श्री उमाकांत बनसोड, श्री राजू देशमुख, श्री प्रणित कडू, श्री सचिन पारधी यांच्या सह निवेदन दिले.
पूर्व नागपुर आमदार कृष्णा खोपड़े यांना प्रतीक बावनकर यांच्या नेतृत्वात, मंगेश डिवटे, बबलू मोहाडीकर, रविकांत वाघ, अभय भोयर, कुनाल डाखोरे, जोशी काका यांच्या सहित निवेदन देण्यात आले. मध्य नागपुर आमदार विकास कुंभारे यांना कृतल वेलेकर व लकष्मीकांत दांडेकर यांच्या नेतृत्वात, गिरीश तीतरमारे, प्रभात अग्रवाल, पीयूष आकरे, विजय धकाते, दिलीप कुंभारे, मितुन निमजे यांच्या सहित निवेदन देण्यात आले. दक्षिण पश्चिम नागपुर आमदार देवेन्द्र फडणवीस यांना विनोद अलमडोहकर व सुरेश खर्चे यांच्या नेतृत्वात, शशिकांत रायपुरे यांच्या सहित निवेदन देण्यात आले. पश्चिम नागपुर आमदार विकास ठाकरे यांना आकाश कावळे व विवेक चापले यांनी निवेदन दिले.