आंबेडकर भवन बचाओ मार्च काढू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10441*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

160

आंबेडकर भवन बचाओ मार्च काढू

– समाजवादी पार्टीचा त्ीाव्र आंदोलनाचा इशारा


विदर्भ वतन, नागपूर : समाजवादी पार्टी नागपूर यांच्या वतीने सोमवारी रिजनल मॅनेजर सिव्हिल लाईन नागपूर येथे बंटी अलेक्झांडर यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन पक्षातील कार्यकर्त्यांनी एमटीडीसी रिजनल मेनेजर कार्यालया समोर आंदोलन केले. अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन तोडण्यात आले असून भवन पाडणारे वरील व ज्या अधिका-यांनी भवन पाडण्याचा आदेश दिला त्यांच्यावर ही गुन्हा दाखल करून कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत आंदोलन छेडण्यात आले. भवन पाडल्याच्या घटनेमुळे आंबेकरी समाज बांधवाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे काम ८ दिवसाच्या आत नव्याने बांधकाम करावे. अन्यथा तीव्र आंदोलन करू, “आंबेडकर भवन बचाओ मार्च ” काढून समाजवादी पार्टीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी मायाताई चौरे, एजाज खान, टी.एच.खान, रवि खोब्रागडे, बंटी अलेक्झांडर, ममता तिवारी, एैनूल खान यांच्या उपस्थितीत आंदोलने करण्यात आली.