पोलिसांच्या दडपशाहीमुळे आशा-गटप्रवर्तकाच्या मोर्च्याला वेगळे वळण
विदर्भ वतन, नागपूर : आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सीआयटीयु तर्फे संपाचे सातव्या दिवशी खंडोबा देवस्थान सुभाष रोड येथून आशा व गटप्रवर्तक यांच्या विशाल मोर्चा काढण्याच्या प्रयत्न करण्यात आला. याची सूचना दोन दिवस आधी पोलीस विभागाला व्हाट्सअप द्वारे देण्यात आली. त्यानुसार पोलीस विभागाने सुद्धा तयारी केली होती. युनियन तर्फे पत्रपरिषद घेऊन पत्रकारांना सर्व माहिती देऊन सरकार योग्य भूमिका घेत नाही म्हणून आम्हाला सोमवारपासून आंदोलन तीव्र करावे लागेल. त्याचे पहिल्या दिवशी विशाल मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु. पोलीस विभागातर्फे युनियनचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांच्या विरुद्ध लागोपाठ दोन दिवस दोन नोटीस पाठवण्यात आल्या. मोर्चा निघण्याचे ठिकाणी शेकडो पोलिसांचा ताफा उभा करून येणा-या महिलांना सविधान चौकाकडे पळवून लावण्याचे काम केले. युनियन कार्यालय मध्ये उपस्थित असणा-या महासचिव प्रीती मेश्राम यांची गणेशपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरसागर साहेब यांनी स्वत: उपस्थित राहून त्यांची घेराबंदी केली. त्यामुळे मोर्चा काढण्याकरिता अडचणी निर्माण झाल्या. एकीकडे शासन आशा व गटप्रवर्तक यांना योग्य मोबदला द्यायला तयार नाही व पोलीस विभाग आंदोलनकर्त्या कर्मचा-यांना आंदोलन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही प्रगतिशील महाराष्ट्राची मोठी शोकांतिका आहे. त्यानंतर सुद्धा शेकडोंच्या संख्येने आशा वर्कर व गटप्रवर्तक संविधान चौक येथे एकत्रित होऊन प्रतीकात्मक घोषणा देत धरणे आंदोलन अधिक तीव्र रुपाने पूर्ण केला. मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद सीईओ तसेच महानगरपालिका आयुक्त यांना पोलिस अधिका-यांच्या मदतीने देऊन आशा व गटप्रवर्तक यांचे प्रश्न माननीय मुख्यमंत्री यांना सादर करण्याची विनंती केली. आशा व गटप्रवर्तक यांचे प्रश्नाबाबत विशेष प्रतिनिधी सोबत लवकर बैठक लावून मार्गी लावावे यावर शिष्टमंडळाने चर्चा केली.
संविधान चौक येथे आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्यातर्फे मोठ्या संख्येने उपस्थित राहून किमान समान वेतन लागू करा या मुख्य मागणीला घेऊन तीव्र निदर्शने केली. शिष्टमंडळात राजेंद्र साठे, रंजना पौनिकर, रूपलता बोंबले , पूर्णिमा पाटील, संगीता राऊत, रेखा पानतावणे, मंदा गंधारे, मोनिका गेडाम , मंदा जाधव, अंजू चोपडे, कांचन बोरकर, लक्ष्मी ठाकरे इत्यादी उपस्थित होते.

