नागपुरात वाढत आहे म्यूकरमायकोसिसच्या बळींची संख्या

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10423*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

114

नागपुरात वाढत आहे म्यूकरमायकोसिसच्या बळींची संख्या

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर- नागपुरातील कोरोनाबाधितांसोबतच बळींची संख्या घटत असतानाच म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराच्या रुग्णांची व मृतांची संख्या वाढत चालली आहे.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे. सोबतच मृतांचीही संख्या आता वाढत असल्याचे वास्तव आहे. या आजारावर प्रभावी असलेल्या अँम्फोटेरिसीन बी. इंजेक्शनच मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने मृतांची संख्या वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोमवारी शहरात ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसच्या एकूण मृतांची संख्या १३८ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात नव्याने १६ रुग्णांची भर पडली. यासोबतच एकूण रुग्णांची संख्या १५१५ वर पोहोचली आहे. तर सोमवारी २३ जणांनी या आजारावर मात करून ते बरे होऊन घरीही परतले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील एकूण बरे होणार्‍या रुग्णांची संख्या ९६४ वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत ४१३ सक्रिय (अँक्टिव्ह) रुग्णांवर शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.