बनावट नोकरभर्तीच्या नावावर कोट्यवधीचा भ्रष्टाचार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10419*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

214

बनावट नोकरभर्तीच्या नावावर कोट्यवधीचा भ्रष्टाचार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नांदेड – कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे नोकऱ्यांचं आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या लोकांमध्ये वाढ झाली आहे. नांदेडमध्ये अशाच एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या टोळीने ९ राज्यांमधील तरुणांना तब्बल कोट्यवधींचा गंडा घातला आहे. त्यांनी तरुणांना जॉयनिंग लेटर, ट्रेनिंगही दिलं. मात्र, नंतर हे सर्व बनावट असल्याचं समोर आलं.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत पोलीस ठाण्यात नोकरीचे आमिष दाखवून 10 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. हिंगोली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता या रॅकेटची व्याप्ती देशातील अनेक राज्यात पसरली असल्याचे समोर आलं. ही टोळी नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांना हेरायची. या तरुणांना रेल्वे, मुंबई महापालिका, एफसीआय, सीआयएसएफ अशा ठिकाणी नोकरीचे आमिष दाखवले जायचे. महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल यासह इतर राज्यातील अनेकांना या टोळीने आपल्या जाळ्यात ओढले होते

तरुणांची फसवणूक कशी केली जायची?

तरुणांना खरं पटावं यासाठी तरुणांचं काही ठिकाणी बनावट ट्रेनिंग घेतलं जायचं. ट्रेनिंग होत असल्याने विश्वासाने शेकडो तरुणांनी त्यांना पैसे दिले. नोकरीचे बनावट ऑर्डर दिल्या जायच्या. मूळ नोकरीच्या ठिकाणी गेल्यावर मात्र आपली फसवणूक झाल्याचे उघड व्हायचे. फसवणूक करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी नांदेड, मुंबई, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि दिल्ली येथून अटक  केली. त्यांच्याकडून 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आतापर्यंत 25 जणांच्या तक्रारी

पोलिसांकडे आतापर्यंत फसवणूक झालेल्या 25 जणांनी तक्रारी केल्या आहेत. या प्रकरणाची व्यापती मोठी असून फसवणूक झालेल्या सर्वांनी वसमत पोलीस किंवा हिंगोली पोलीसांकडे तक्रार करण्याचे आवाहन नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केले आहे.