गोंडवाना थीम पार्क स्थापित करा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10401*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

205

गोंडवाना थीम पार्क स्थापित करा

-रॉयल गोंडवाना आदिवासी विकास युवा संघाने केली मुख्यमत्र्यांना मागणी

विदर्भ वतन, नागपूर : सध्या नावारुपास आलेल्या बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणि संग्राहलय, गोरेवाडा, नागपूर या प्राणी संग्राहलयाला विदर्भ विभागातील आदिवासी समाजाने गोंडवाना पार्क असे नाव देण्याची पूर्वी मागणी केली होती. या मागणीस राज्यातील वरिष्ठ पुढा-यांनी मान्य केले होते. परंतु वर्तमान शासनाने गोरेवाडा प्राणी संग्राहलयाला बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्राहलय असे नाव दिले. या बाबतीत नागपुर येथे आदिवासी समाजाने आंदोलन सुद्धा केले होते.ही बाब लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदिवासी समाज बांधवांची भावना लक्षात घेऊन बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्राहलय, गोरेवाडा नागपुर येथे गोंडवाना थीम पार्क उभारु अशी घोषणा उद्यानाचा उद्घाटन समारोहात केली होती. या गोंडवाना थीम पार्कला स्थापित करुन समाजाच्या काही मागन्या पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आहे. तसेच या प्रकल्पात स्थापित होण्या-या गोंडवाना थीम पार्क येथे स्थायी, अस्थायी, कंत्राटी कर्मचारी, कामगार या पदावर आदिवासी बांधवांची नेमणूक करण्यात यावी,गोंडवाना थीम पार्क मध्ये आदिवासींना सांस्कृतिक, सामाजिक, आणि धार्मिक उत्सव कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असावी, उपरोक्त उल्लेखित प्राणी संग्राहलय आणि थीम पार्क मध्ये व्यवस्थापकिय अथवा विकास समित्यांवर आदिवासी व्यक्तिंची नेमणूक करण्यात यावी, असे रॉयल गोंडवाना संघाचे संस्थापक अध्यक्ष आकाश केशव मडावी यांनी सांगीतले. शिष्टमंडळात माजी महापौर मायाताई इवनाते, रिजुम फाऊंडेशन अध्यक्ष विवेक नागभिरे, रवी पेंदाम, स्वप्निल वलके, सुनेश कुळमेथे, श्याम कार्लेकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.