
योग
नियमित योगासने करूया सर्वजण
जपुया शरीर आणि मनाचे आरोग्य
निसर्गाच्या सानिध्यात रमुया आपण
त्याच्या रक्षणाचे पार पाडूया कर्तव्य
श्र्वासाच्या गतीवर निर्भर आहे जीवन
करावा सकाळ सायंकाळ प्राणायाम
सर्वांग सुदृढ निरोगी राहिल्यास मिळेल
सुखी समृद्ध जीवनाला नवा आयाम
आपल्या पूर्वजांनी आपणास आहे
दिला,आरोग्याचा खजिना अनमोल
शुध्द सात्विक आहाराची जोड देऊन
साधूया आरोग्याच्या दृष्टीने समतोल
घ्यावयाचा असेल आनंद जीवनाचा
वाट्याला नको असतील रोगाचे भोग
समावेश करावा दैनंदिन वेळापत्रकात
आग्रहाची विनंती करा दररोज योग
स्वप्ना अनिल वानखडे
वर्धा

