गॅस दरवाढीच्या निषेधार्थ चुलीवर मसाले भात बनवून केले वाटप

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10386*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

322

गॅस दरवाढीच्या निषेधार्थ चुलीवर मसाले भात बनवून केले वाटप

राहुल गांधी यांचा वाढदिवसानिमित्य शहर काँग्रेसचा “संकल्प दिवस”

विदर्भ वतन, नागपूर : अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे नेते खा. राहुल  गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात नागपूर शहर काँग्रेसच्या वतीने सक्करदरा चौक येथे महिला काँग्रेसच्या माध्यमातून महागाईच्या विरोधात चूलीवर मसाला भात बनवून वितरण केले. यावेळी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणी व निर्मला सीतारामन यांचे मुखवटे लावून महागाईचा प्रतिकात्मक निषेध केला.
दक्षिण नागपूर ब्लॉक काँग्रेस कमेटी, सेवादल, युवक काँग्रेस, एन एसयूआय, इंटकच्या सर्व अध्यक्ष व पदाधिका-यांनी आज एकत्र येऊन महागाईच्या विरोधात विविध मुद्द्यावर निदर्शने करत महागाई, बेरोजगारी, शेतकरी विरोधी कायदा, या सर्व गोष्टीं करिता केंद्रातील सरकार बदलणे एकच पर्याय आहे. या करिता आज संकल्प दिवस म्हणून साजरा करत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात नगरसेवक संजय महाकाळकर, मनोज गावंडे, गजराज हटेवार,  महिला काँग्रेस अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक, संगीता उपरीकर, ब्लॉक अध्यक्ष दिनेश तराळे, विश्वेश्वर अहिरकर, प्रवीण गवरे, माजी नगरसेवक वासुदेव ढोके, माजी नगरसेविका नैना झाडे, प्रवीण सांदेकर आशिष ढोक, राजू भोंडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव अक्षय हेटे, रौनक चौधरी, चक्रधर भोयर, निलेश खोरगडे, कार्याध्यक्ष सुशांत लोखंडे, एनएसयुआयचे प्रदेश सचिव प्रतीक कोल्हे, अध्यक्ष प्रणय ठाकूर,विनाताई बेलगे, शुभम तल्हार, छोटा अमजद भाई, डॉ. मनोहर तांबूलकर, राजेश राहाटे, शत्रू चंदेल, पिंटू तिवारी, विपुल गजभिये, मामा राऊत, बापू नगराळे, प्रफुल भाजे, परमेश्वर राऊत, वसंता लोंदासे, सुनील पाटील, उमेश शाहू, बालू शेख, अरविंद क्षीरसागर, गुणवंत राव टापरे प्रकाश ढगे सतीश भगत, सय्यद अली, नियामत ताजी, ताज राजा अहमद, इम्रान पठाण, भोला कुचणकर, राहुल अभंग, सुहास नानवटकर, सौरभ काळमेघ, सर्फराज खान, अली भाई, लतीफ भाई, रमेश वानखेडे, कल्पना जोगे, रत्नामाला जाधव, रंजना कडुकर,ज्योती ढोके, सेवादलचे गोविंदराव खोब्रागडे, डेहनकर गुरुजी, भगवतकर, नासरे, महेश बांते,भुजंगराव ठाकरे सोबत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.