प्रवीण उपगन्लावार आणि आनंद खांडरे यांनी पोलिसांना दिला माफीनामा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10380*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

212

प्रवीण उपगन्लावार आणि आनंद खांडरे यांनी पोलिसांना दिला माफीनामा

-केजरीवाल यांचे विरोधात विकृत लिखाण प्रकरण

विदर्भ वतन, चंद्रपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह आणि अन्य नेत्यांविरोधात समाजमाध्यमांवर सातत्याने विकृत लिखाण करणा-या चंद्रपुरातील प्रवीण उपगन्लावार आणि आनंद खांडरे यांची आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी चांगलीच जिरविली. पोलिसात तक्रार करताच या दोघांचेही धाबे दणाणले. थेट रामनगर पोलिस ठाणे गाठून उपगन्लावार आणि खांडरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणी राज्य सभा सांसद संजय सिंह यांच्या नावे माफीनामा लिहून दिला. आमचे कॅरीयरचा प्रश्न आहे. यापुढे अशी चूक होणार नाही, असे म्हणत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची माफीही मागितली.
प्रवीण उपगन्लावार आणि आनंद खांडरे मागील अनेक दिवसांपासून काही विशिष्ट पक्षाच्या नेत्यांविरोधात समाज माध्यमांवर विकृत लिखाण करीत आहे. या दोघांनाही अनेकदा समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु आपले कुणीच वाकडे करु शकत नाही, या अविभार्वात त्यांच्या भाषेचा दर्जा घसरत गेला. विकृत आणि विद्वेष वाढत गेला. १६ जून रोजी प्रवीण उपगन्लावार यांना आपचे खासदार संजय सिंह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांविषयी फेसबुकवर अतिशय खालच्या तसेच घाणेरड्या भाषेत गरळ ओकली. त्यावर नेहमीप्रमाणे आनंद खांडरे यांनीही उपगन्लावार यांच्याही शब्दाला लाजवेल, अशा प्रतिक्रिया टाकल्या. नेहमीप्रमाणे आपले काहीच होणार नाही, असा समज करुन या दोघांनीही समाज माध्यमांवर आपल्या विकृतीचे प्रदर्शन सुरूच ठेवले. दरम्यान याची माहिती शनिवारी आपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना झाली. आपचे जिल्हा अध्यक्ष सुनील देवराव मुसळे,संस्थापक सदस्य जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार ,कोषाध्यक्ष भिवराज सोनी अँड.प्रतिक विराणी यांनी थेट रामनगर पोलिस ठाणे गाठले आणि या दोघांचीही रितसर तक्रार केली. या दोघांनाही पोलिसांनी ठाण्यात आणले. त्यानंतर मात्र उपगन्लावार आणि खांडरेचे धाबे दणाणले. गयावया केली. आपच्या कार्यकर्त्यांची माफी मागितली. एवढेच नाहीत तर दोघांनीही स्वतंत्रपणे ठाणेदारांना माफीनामा लिहून दिला. यापुढे अशी चूक कधीही करणार नाही, अशी कबूली त्यांनी दिली.
यावेळी संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, बबन कृष्णपालिवार,सूर्यकांत चांदेकर ,अ‍ॅड राजेश विरानी, राजेश चेडगुलवार, सिकंदर सागोरे तसेच आम आदमी पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.