किमान वेतनासाठी आशाचे काम बंदच – संप चालूच राहील

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10376*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

214

किमान वेतनासाठी आशाचे काम बंदच – संप चालूच राहील

-सीआयटीयू तर्फे आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले

विदर्भ वतन, नागपूर : सीआयटीयू तर्फे आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले की , आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याकडे निधी नसल्यामुळे आम्ही आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना कोणताही नवीन निधी किंवा किमान समान वेतन देऊ शकत नाही. त्यामुळे आशा व गटप्रवर्तक यांनी आपला बेमुदत संप मागे घ्यावा. परंतु दीड वषार्पासून कोरोनाच्या कामात राबणा-या, आठ तास पेक्षा जास्त काम करणा-या कर्मचा-यांना शासन कोणती वाट द्यायला तयार नाही. त्यामुळे 15 तारखेपासून सुरू असणा-या बेमुदत संपाला तीव्रता देण्याचे दृष्टिकोनातून सीटु तर्फे सोमवारी 21 तारखेला संपूर्ण राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर मोर्चा काढणार. त्याचप्रमाणे नागपूर जिल्हा परिषदेवर सुद्धा खंडोबा देवस्थान सुभाष रोड कॉटन मार्केट येथून सकाळी 11 वाजता मोर्चा जाणार आहे. त्यामध्ये आशा कर्मचा-यांच्या समर्थनार्थ अंगणवाडी कर्मचारी सुद्धा मोर्चात सामील होणार असा निर्णय अंगणवाडी संघटनेने घेतलेला आहे.
शासनाकडे आशा व गटप्रवर्तक यांना देण्याकरता निधी नसल्यामुळे मंगळवारी 22 तारखेला संविधान चौकात आशा व गटप्रवर्तक थाळी नाद आंदोलन करत महाराष्ट्र शासनाला मदत करण्याकरिता जनतेमध्ये जाऊन भीक मागो आंदोलन करणार अशी माहिती राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, कांचन बोरकर परिषदेत ही माहिती दिली.जो पर्यंत आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचा-यांच्या दर्जा मिळत नाही व आशांना अठरा हजार रुपये व गटप्रवर्तक यांना एकवीस हजार रुपये मासिक वेतन शासन देत नाही. तो पर्यंत बेमुदत संप चालू राहणार असे सांगण्यात आले.