येरे येरे पावसा
येरे येरे पावसा
रात्री अन दिवसा ।।धृ।।
वाहू दे नद्या नाली
येऊ दे हसू गाली
रुसे तू असा कसा
येरे येरे पावसा
रात्री अन दिवसा—–।।१।।
कधी हसतो खो-खो
कोसळतो तू धो-धो
आमचा होतो ससा
येरे येरे पावसा
रात्री अन दिवसा——।।२।।
कधी ही भुरभुर
पळे तू दूरदूर
शिंपला सडा जसा
येरे येरे पावसा
रात्री अन दिवसा—–।।३।।
देतो खूप झपके
थेंब रुपी ठिपके
घोडयाची टाप जसा
येरे येरे पावसा
रात्री अन दिवसा—–।।४।।
कुठे तुझा भरोसा
येतो बघ तू असा
येई पाहुणा जसा
येरे येरे पावसा
रात्री अन दिवसा —-।५।।
वाट पाही सगळे
अश्रुत बुडे डोळे
निर्दयी झाला कसा
येरे येरे पावसा
रात्री अन दिवसा—-।।६।।
देना मातीस ओल
गेली पातळी खोल
पडे कोरडा घसा
येरे येरे पावसा
रात्री अन दिवसा—-।।७।।
तूच आहेस वाली
धान्य कणगी खाली
सळू नको रे असा
येरे येरे पावसा
रात्री अन दिवसा—-।।८।।
श्री. युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:- बार्शी
जिल्हा:- सोलापूर
9405237081

