Home अभिनंदन “पीपल टू पीपल ” संस्थे तर्फे गेल्या ५२ दिवसापासू गरजूंना भोजनदान सुरुच…

“पीपल टू पीपल ” संस्थे तर्फे गेल्या ५२ दिवसापासू गरजूंना भोजनदान सुरुच…

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10360*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

217 views
0

“पीपल टू पीपल ” संस्थे तर्फे गेल्या ५२ दिवसापासू गरजूंना भोजनदान सुरुच…

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर.- कोरोना काळात नागपूर शहरात गेल्या ५२ दिवसापासून “पीपल टू पीपल संस्थेच्या ” वतीने अध्यक्षा अनुश्री खोब्रागडे यांच्या हस्ते गरजू व गरीब लोकांना भोजन वाटप करताना नागपूर येथे गेल्या दीड वर्षापासून नागपूर शहरात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आणि लॉकडाउन नंतर माणसांचे जीवन अस्ताव्यस्त झाले. याकालावधीत अनेक रोजदांरी करणा-यां पासून ते प्रत्येक स्तरावर कार्यरत असणा-यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. विशेषतः हातावर आणणे आणि पानावर खाणा-यांचे हाल होतांना पाहून पीपल टू पीपल हि संस्था गरीबांच्या मदतीला धावून आली.
या संस्थेच्या पुढाकाराने अनेकांना उपाशी झोपण्या पासून वाचवता आले. या संस्थेने खूप मोठे मोलाचे सामाजिक कार्य केले आहे. मागील ५२ दिवसांपासून संस्थेचे कार्यकर्ते व शुभ चिंतकांव्दारे दररोज सडकेवर रोडवरील उपाशी राहणारे, भिक्षा मागनारे आणि आर्थिक दृष्टया हलाखीचे जीवन जगत असलेल्यांना भोजन वाटप करण्यात येत आहे. कोरोना काळात संस्थेने विविधांगी कार्य करून अनेकांना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. अनेकांना निःशुल्क जम्बुलन्सची सोय उपलब्ध करून दिली. तसेच झोपडपट्टीतील रहिवाशी , गरीबांना औषधी खरेदी करण्यासाठी , दवाखान्या तील टेस्ट करण्याकरीता देखील आर्थीक मदत केली. किन्नर समाजातील काहींना ईलेक्टीचे बील अदा करून उन्हाळयाच्या उकाडयापासून रक्षण करण्याचाही प्रयत्न केला. याशिवाय काहींना मागणीनूसार आयुर्वेदीक काढा पोहचवून देणे,औषधी देणे, प्रतिकार शक्ती वाढविण्या करीता आजारी लोंकांना फळे देणे आपण आर्थीक कमजोर गरीबांना दवाखान्याचा पुर्ण खर्चही दिला. काही परीवारातील कर्ता व्यक्तिचे कोरोनाने निधन झाले व कुटूंब सडकेवर येण्याची स्थिती निर्माण झाली अशांना आर्थीक मदतही केली. संस्थेतर्फे’ पीपल्स किचन ‘ या संकल्पनेव्वारे दररोज अंदाजे  ७०० ते ८०० लोकांना स्वयंपाक करून भोजन वाटप करण्यात आले. भोजन वाटपाची प्रक्रीया वर्धा रोडवरील चिंचभवन, एअरपोर्ट मेट्रोपासून ते जयप्रकाशनगर , छत्रपती चौक, साई मंदीर, अजनी चौक, महाराज बाग, रामनगर गेट, मिठानिम, संविधान चौक, कस्तूरचंद पार्क कार्नर आदींमधील सर्व चौकात भोजन देत संस्थेचे कार्यकर्ते सहकार्य करित आहेत. यापूढेठी जनजीवन सुरळीत होईपर्यंत हा उपक्रम संस्थेदारे नियमित ठेवण्याचा मानस आहे. याकरीता प्रामृख्याने संजीवनी संस्कार बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक सुषमा नागरे कांबळे, परिवर्तन फाउडेशन जामठाचे योगश रेकाम, ज्ञानदिप शिक्षण संस्थेच्या भावना जनबंधू, 7 स्टार फाऊन्डेशनच्या पूजा फुलझेले तसेच संस्थेचे पदाधिकारी धम्मचारी तेजधम्म, अनुश्री खोब्रागडे, समीर लुथरा, कार्यकर्ते मोरूती ठाकरे, ज्योतीबाई ठाकरें, उषा कावळे, शितल इंगाडे, विकी गायधने आणि सुरज सोलंकी इत्यादींचे अथक प्रयत्न व सहकार्य लाभले.