Home नागपूर उमरेड ते चिमूर महामार्गाचे आमदार राजू पारवे यांनी केले निरीक्षण

उमरेड ते चिमूर महामार्गाचे आमदार राजू पारवे यांनी केले निरीक्षण

0
उमरेड ते चिमूर महामार्गाचे आमदार राजू पारवे यांनी केले निरीक्षण

उमरेड ते चिमूर महामार्गाचे आमदार राजू पारवे यांनी केले निरीक्षण

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, उमरेड – गुरुवार ला उमरेड ते चिमूर या रस्ते महामार्गाची पाहणी उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. राजूभाऊ पारवे यांनी केली. उमरेड शहरातील गिरड रोड रस्त्याची पाहणी करून पावसानी झालेल्या अडथळ्यांच्या कामाचे निराकरण करून रस्ता व नाल्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. समोर गरडापार येथील दोन्ही कडेच्या उर्वरित नाल्या व गावात जाणाऱ्या अप्रोच रस्त्याचे बांधकाम करण्यास सांगितले. तसेच पाहमी चिचाळा नवीन बस बे, नाली व अप्रोच रस्त्याचे बांधकाम करण्यास सांगितले. व मालेवाडा येथील शेतकऱ्याचा शेतात जाणारे अप्रोच रस्ते दुरुस्ती करण्यास सांगितले. या वेळी विवेक मिश्रा, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, नागपूर यांना ७ दिवसाच्या आत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या वेळी सरपंच विजय कारेमोरे, प्रवीण पडोळे, नारायण इंगोले, केतन रेवतकर, रवी कांडाळकर, खालिद शेख तसेच शेतकरी व गावातील नागरिक उपस्थित होते.