Home Breaking News बाबुपेठ येथील स्मशानभूमीत प्रदूषणमुक्तीसाठी एलपीजी शवदाहिनी

बाबुपेठ येथील स्मशानभूमीत प्रदूषणमुक्तीसाठी एलपीजी शवदाहिनी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10349*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

290 views
0

बाबुपेठ येथील स्मशानभूमीत प्रदूषणमुक्तीसाठी एलपीजी शवदाहिनी

– महापौरासह महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,चंद्रपूर,  : पारंपारिक पद्धतीने लाकडाद्वारे करण्यात येणाऱ्या शवदहनामुळे वातावरणात प्रदूषणात भर पडते. त्याला आळा घालण्यासाठी बायपास मार्गावरील प्रभागात बाबुपेठ स्मशानभूमी येथे एलपीजी गॅसवर चालणारी शवदाहिनी उभारण्यात येत आहे. या कामाची पाहणी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्यासह महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली. येत्या महिनाभरात ही शवदाहिनी लोकसेवेत रुजू होईल, अशी माहिती महापौरांनी यावेळी दिली.

यावेळी पाहिणीदरम्यान उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेविका छबूताई वैरागडे, नगरसेविका नीलम आक्केवार, नगरसेविका कल्पना बगुलकर, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेवक स्वामी कनकम यांची उपस्थिती होती.  

शवदहनासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा लागतो. त्यासाठी जंगलतोड होत असते. शिवाय लाकडाद्वारे करण्यात येणाऱ्या शवदहनामुळे वातावरणात प्रदूषण होते. एलपीजी गॅसच्या शवदहनातून वातावरणात प्रदूषण कमी होते. एलपीजी गॅसवरील शवदाहिनीमुळे कार्बनचे प्रमाण कमी होऊन झाडे ही कापण्यापासून वाचतील. त्यासाठी बाबुपेठ प्रभागातील या स्मशानभूमीत ही शवदाहिनी लावण्याचे काम सुरू आहे. आता येथे गॅस शेड, चिमणीसह एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी सांगितले. येथे सपाटीकरण व काँक्रीटपाथ बांधकाम, सौदर्यीकरण देखील करण्यात येणार आहे. स्मशानभूमीलगतच्या जागेची मोजणी करून अतिक्रमण थांबविण्याच्या सूचनादेखील महापौरांनी दिल्या.