गेल्या 24 तासात 69 कोरोनामुक्त ; 14 पॉझेटिव्ह 

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10344*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

212

गेल्या 24 तासात 69 कोरोनामुक्त ; 14 पॉझेटिव्ह 

 जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2222 बेड उपलब्ध

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, यवतमाळ, अश्विन इंगळे :  गेल्या 24 तासात जिल्ह्यात 14 जण पॉझेटिव्ह तर 69 जण कोरोनामुक्त झाले आहे.  जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी  एकूण 1444 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 14 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1430 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 164 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72620 तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70670 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 70 हजार 821 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 98 हजार 199 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.83 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी  दर 0.97 आहे  तर मृत्युदर 2.46 आहे.
             जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2222 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 57 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2222 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 30 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 547 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 21 रुग्णांसाठी उपयोगात तर  505 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 6 उपयोगात तर 1170  बेड शिल्लक आहेत.