वंचितला काँग्रेसची आशा, कांग्रेसने बाळासाहेब आंबेडकरांना अधिकृतपणे कळवावे- वंचित बहुजन आघाडी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10340*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

137

वंचितला काँग्रेसची आशा, कांग्रेसने बाळासाहेब आंबेडकरांना अधिकृतपणे कळवावे- वंचित बहुजन आघाडी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर-वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने आज पत्रपरिषद संबोधित करतेवेळी राहुल वानखेडे , रवी शेंडे ,राजू लोखंडे तसेच नागपूर जिल्हा अध्यक्ष विलास वाटकर यांच्या नेतृत्वात ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडी सोबत युती करण्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया मांडल्या.
आगामी 2024 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक काँग्रेस ही बहुजन आघाडी ला घेऊन लढेल असे नाना पटोले यांनी म्हटले होते. तरी काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणे आपल्या केंद्रीय नेते यांची परवानगी घेऊन रीतसर बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सन्मानजनक युती करीत असेल तर तसे अधिकृतपणे काँग्रेस कळवावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी सर्व प्रकारच्या निवडणुका स्वबळावर लढण्यास सक्षम आहे असे यावेळी म्हटले. पत्रपरिषद संबोधित करते वेळी वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ संयोजक राहुल वानखेडे, नागपूर शहर अध्यक्ष रविभाऊ शेन्डे , राजू लोखंडे, विवेक हाडके आणि नागपूर जिल्हा अध्यक्ष विलास वाटकर यांची मंचावर उपस्थित होते.