Home Breaking News नागपुरातील  लिबर्टी उड्डाणपुलाच्या खाली केलेल्या सौंदर्यीकरण्याच्या माध्यमातून भविष्यातील पिढीला  मार्गदर्शक संदेश मिळेल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  

नागपुरातील  लिबर्टी उड्डाणपुलाच्या खाली केलेल्या सौंदर्यीकरण्याच्या माध्यमातून भविष्यातील पिढीला  मार्गदर्शक संदेश मिळेल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  

0
नागपुरातील  लिबर्टी उड्डाणपुलाच्या खाली केलेल्या सौंदर्यीकरण्याच्या माध्यमातून भविष्यातील पिढीला  मार्गदर्शक संदेश मिळेल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  

नागपुरातील  लिबर्टी उड्डाणपुलाच्या खाली केलेल्या सौंदर्यीकरण्याच्या माध्यमातून भविष्यातील पिढीला  मार्गदर्शक संदेश मिळेल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर- नागपुरातील सदर भागातील लिबर्टी उड्डाणपुलाच्या खाली केलेल्या सौंदर्यीकरण्याच्या माध्यमातून भविष्यातील पिढीला एक चांगला आणि मार्गदर्शक संदेश मिळेल असा विश्वास  केंद्रीय  महामार्ग,रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सुक्ष्म , लघु व मध्यम उद्योग  मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपुरात व्यक्त केला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे संविधान चौक ते मानकापूर क्रीडासंकुल पर्यंत असणा-या  उड्डाणपुलाच्या खाली करण्यात आलेल्या सौंदर्यीकरण  आणि रंग कामाचे उद्घाटन आज नितीन गडकरी यांच्या हस्ते अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे  करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी राज्याचे पशुसंवर्धन आणि क्रीडा मंत्री सुनील केदार , महापौर दयाशंकर तिवारी  प्रामुख्याने उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे 4 पुर्णांक 55 किलोमीटर लांबीच्या आणि सुमारे 4 कोटी रुपयांच्या तरतुदीने बांधण्यात आलेल्या या उड्डाणपुलाच्या.  खाली असणाऱ्या 87 पिलर्सचे सौंदर्यीकरण विशेष रंगाद्वारे करण्यात आले आहे . नागपूर शहरातील जैवविविधता,  वन्यजीव यांची माहिती द्विभाषी पद्धतीमध्ये या स्तंभावर  दिली आहे.  यामुळे नागपुरमधील विद्यार्थ्यांना नागपूरच्या या नैसर्गिक संपदेची माहिती सहजपणे उपलब्ध होणार आहे.  नागपूर शहराच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या 25 व्यक्तींची माहिती, खेळ, विज्ञान क्षेत्राचि माहिती  सुद्धा या पिलरखाली फलक आणि प्रतिकृती द्वारे लावण्यात आली असून ती द्विभाषी पद्धतीत उपलब्ध असल्याने या ऐतिहासीक वारश्याची  विद्यार्थ्यांना आणि भावी पिढीला होणार आहे असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं.

कोरोनामध्ये  अतिशय हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा कलाकारांनी हे सौंदर्यीकरणाच काम पूर्णत्वास नेलं याबद्दल त्यांनी कलाकारांचे अभिनंदन केले .  कलाकारांचा सत्कार सुद्धा यावेळी गडकरींच्या हस्ते करण्यात आला. सदर पुलाच्या  सौंदर्यीकरणाच्या संरक्षणाची जबाबदारी अंजुमन   सारख्या शैक्षणिक संस्थांनी घ्यावी असे आवाहन सुद्धा गडकरी यांनी यावेळी केलं.

शहरातील दळणवळणाला आपल्या विकास कामाद्वारे चालना देणाऱ्या नितीन गडकरींनी नागपूरकरांना एक विरंगुळा म्हणून या सौंदर्यीकरणाद्वारे एक भेट दिल्याची भावना नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली.

  दोन  शहरांमधील अंतर कमी करण्याच्या मुंबई-पुणे उड्डाणपुलाचे नितीन गडकरी यांनी काम पूर्णत्वास नेलं. अशाच प्रकारचे विकास कामे ते नागपुरात करतच आहेत असे मत राज्याचे क्रीडा विकास मंत्री सुनील केदार यांनी यावेळी व्यक्त केलं.

  या कार्यक्रमाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी लोकप्रतिनिधी नगरसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नागपूरचे प्रकल्प संचालल अभिजीत जिचकार यांनी  केले.