धक्कादायक! गुजरातच्या साबरमती नदीत आढळला कोरोना विषाणू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10320*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

190

धक्कादायक! गुजरातच्या साबरमती नदीत आढळला कोरोना विषाणू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : अहमदाबाद – देशात कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरताना दिसत असली तरी संकट अजून पूर्णपणे टळलेले नाही. त्यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुजरात राज्यातील अहमदाबादच्या मध्यभागी असलेल्या साबरमती नदीत करोना विषाणू आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. या नदीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. त्यात कोरोनाचा संसर्ग आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, साबरमती व्यतिरिक्त अहमदाबादचे दोन मोठे तलाव कांकरिया आणि चांदोलामध्येही कोरोना विषाणूचे जीवाणू आढळले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी गांधीनगरने साबरमती नदीतून पाण्याचे नमुने घेतले होते. त्यांचा अभ्यास करण्यात आला. पृथ्वी व विज्ञान विभागाचे प्राध्यापक प्राध्यापक मनीष कुमार यांच्या म्हणण्यानुसार, तपासणीदरम्यान कोरोना विषाणू पाण्याच्या नमुन्यातून सापडला जो अतिशय धोकादायक आहे. पाण्याचे नमुने दर आठवड्यात ३ सप्टेंबर ते २९ डिसेंबर २०२० या काळात नदीतून घेण्यात आले. नमुना घेतल्यानंतर याची तपासणी केली गेली आणि करोना विषाणूचे संसर्गित जीवाणू आढळले. साबरमती नदीतून ६९४ नमुने, कांकरिया तलावातील ५४९ आणि चांदोला तलावामधून ४०२ नमुने घेण्यात आले. या नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू आढळला आहे.

त्याचबरोबर नैसर्गिक पाण्यातही विषाणू टिकू शकतो, असा विश्वास संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील सर्व नैसर्गिक जल स्त्रोतांचे नमुने घ्यावे, कारण व्हायरसचे बरेच गंभीर म्यूटेशन करोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये दिसून आले आहेत, असे मनीषकुमार म्हणाले.