अनिल देशमुख यांच्या तीन निकटवतीर्यांवर ईडीचे छापे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10287*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

205

अनिल देशमुख यांच्या तीन निकटवतीर्यांवर ईडीचे छापे

विदर्भ वतन, नागपूर- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर न्यायालयाच्या आदेशानंतर देशमुख यांचीही चौकशी करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशमुख यांची चौकशी केल्यानंतर आता त्यांच्या निकटवतीर्यांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ईडीच्या मुंबई पथकाने बुधवारी शहरातील एक व्यापारी, दोन चार्टर्ड अकाउंटन्ट यांच्या कार्यालयावर व घरी छापे टाकले. यात अग्रवाल, पंजवानी, बाहेती नामक तिघांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई करण्यात आली. पथकाने कारवाईतून काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. देशमुखांच्या निकटवर्तीय तीन व्यावसायिकांवर यापूवीर्ही छापे टाकण्यात आले आहे.