Home Breaking News भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग ५ (ब) येथील नगरसेविका दुर्गा चंद्रभूषण हत्तीठेले यांची...

भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग ५ (ब) येथील नगरसेविका दुर्गा चंद्रभूषण हत्तीठेले यांची सदस्यता रद्द

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10283*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

106 views
0

भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग ५ (ब) येथील नगरसेविका दुर्गा चंद्रभूषण हत्तीठेले यांची सदस्यता रद्द

विदर्भ वतन,नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग ५ (ब) येथील नगरसेविका दुर्गा चंद्रभूषण हत्तीठेले यांची सदस्यता रद्द करण्यात आली. त्या अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या जागेवरून निवडणूक जिंक ल्या होत्या. परंतु, त्यांना देण्यात आलेल्या मुदतीत त्यांचे जातीचे प्रमाणपत्र सादर न करण्यात आल्यामुळे नगरविकास विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
नियमानुसार आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या उमेदवारास सहा महिन्याच्या आत जात वैधता तपासणी समितीकडून प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. उमेदवारी अर्ज सादर करताना यासंदर्भात प्रतिज्ञापत्रही सादर करावे लागते. निवडून आल्यानंतर हत्तीठेले यांना २३ आॅगस्ट २0१७ पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. परिणामी, त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, ४ सप्टेंर २0१७ रोजी काही नगरसेवकांनी हत्तीठेले यांना निलंबित करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. परंतु, शासनाने कारवाई ऐवजी थेट प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिन्यांनी वाढवून दिली होती. परंतु त्यानंतरही त्या जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकल्या नाही. यासंदर्भात १ आॅक्टोबर २0१८ रोजी मनपा प्रशासनाने नगर विकास विभागाला माहिती दिली. नियमानुसार, सदस्यत्व रद्द झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक अपेक्षित आहे. परंतु, पुढील वर्षी महापालिकेच्या सर्वसाधारण निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत नगरविकास विभागाच्या आदेशातही पोट निवडणुकीसंदर्भात माहिती देण्यात आली नाही.