Home Breaking News मुलांना जीवे मारण्याची धमकी; खंडणीप्रकरणी महिलेला अटक

मुलांना जीवे मारण्याची धमकी; खंडणीप्रकरणी महिलेला अटक

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10278*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

65 views
0

मुलांना जीवे मारण्याची धमकी; खंडणीप्रकरणी महिलेला अटक

विदर्भ वतन,नागपूर : शहरातील एका डॉक्टर दाम्पत्याला त्याच्या मुलांच्या जीवाच्या बदल्यात एक कोटी रुपयांची खंडणी एका अनोळखी पत्राद्वारे करण्यात आली होती. या प्रकरणी दाखल तक्रारीनंतर पोलिसांच्या तपासात सीसीटीव्हीमध्ये एक महिला आरोपी दिसून आली. महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिने सर्व प्रकाराची माहिती दिल्यानंतर आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. तुषार सदाशिव पांडे (वय ४८ वर्षे रा. प्लॉट नंबर ८ पायोनिअर रेसिडन्सी पार्क, हॉटेल एअर पोर्ट सेंटर पॉईंटजवळ, सोमलावाडा, नागपूर) व त्याची पत्नी हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांचे सोनेगाव पोलिस ठाणे हद्दीत उत्कर्ष मॅटर्निटी होम प्लॉट नंबर ३ जयहिंद सोसायटी काचोरे लॉनजवळ मनीषनगर नागपूर येथे हॉस्पिटल आहे. ११ जून रोजी संध्याकळी ५.३0 वाजताच्या सुमारास त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एक कुरियर आले. त्यामध्ये फिर्यादी यांचे दोन मुलांचे जीवाच्या बदल्यात एक कोटी रुपयाची खंडणी आणि पोलिसांना माहिती दिल्यास जीवे ठार मारण्याच्या धमकीचे पत्र प्राप्त झाले. त्यानंतर फियार्दी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. सदर गुन्हाच्या तपासात अनोळखी आरोपीचा शोध घेत असता ज्या कुरियरने हे पत्र पाठविण्यात आले येथील तसेच परिसरातील चौभागातील सीसीटीव्ही कॅमेराची पाहणी पोलिसांनी केली. यात एक होन्डा अँक्टिवा मोपेड गाडीवरील संशयित महिला निष्पन्न झाली. सदर महिलेचा तिच्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमे-याच्या मदतीने शोध घेण्यात आला. सदर महिलेजवळ ९५९३ नंबरची मोपेड गाडी असल्याचे आढळून आले. ही महिला युको बँक, मनीषनगरच्या समोरील शिल्पा सोसायटीकडे जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन सदर गुन्हयाबाबत विचारपूरस केल्यानंतर महिलेने गुन्ह्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. सदरची कारवाई नागपूर शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त ( दक्षिण प्रभाग ) डॉ. दिलीप झळके, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सुनिल फुलारी नागपूर शहर यांच्या निदेर्शांन्वये पोलिस उपआयुक्त परिमंडळ क्रमांक ४ डॉ. अक्षय शिंदे, सहा. पोलिस आयुक्त (अजनी विभाग) डॉ. नीलेश एस. पालवे यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय प्र. आकोत, पोलिस उप निरीक्षक विकास अ. मनपिया, पोहवा तेजराम देवळे, अविनाश ठाकरे, रणधीर दीक्षित, शैलेश बडोदेकर, मिलिंद पटले, पोहवा बंदना लोटे, नापोशि गोपाल देशमुख, कमलेश गणेर, बजरंग जुनघरे, नितीन बावणे, प्रशांत सोनुलकर, पोशि राजेंद्र नागपुरे, कुणाल लाडगे, सर्व पोस्टे बेलतरोडी नागपूर तांत्रिकी सहाय्यक नापोशि दीपक तन्हेकर आणि नापोशि मिथून नाईक सायबर विभाग कार्यालय पोउपआ परिमंडळ क्रमांक ४ नागपूर शहर यांनी केली.