Home Breaking News नागपूरच्या तहसील कार्यालयात स्टॅम्प पेपरचा काळाबाजार

नागपूरच्या तहसील कार्यालयात स्टॅम्प पेपरचा काळाबाजार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10271*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

215 views
0

नागपूरच्या तहसील कार्यालयात स्टॅम्प पेपरचा काळाबाजार

– कांग्रेसचे महाराष्टÑ प्रदेश सरचिटणीस रागीट यांचा आरोप

विदर्भ वतन,नागपूर : नागपूर जिल्हा येथील तहसील कार्यालयात नोंदणीकृत स्टॅम्प वेंडरकडून स्टॅम्प पेपरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. गरजू लोकांना येथे एकाही स्टॅम्प वेंडरकडून स्टॅम्प पेपर सहजासहजी मिळत नाही. येथील स्टॅम्प वेंडर स्टॅम्प पेपरचा तुटवडा आहे असे खोटे सांगून चढ्या दरात अवैधरित्या स्टॅम्प पेपरची विक्री करत असल्याचे निदर्शनात येत आहे. येथे १०० रु. चा स्टॅम्प पेपर ३०० रु. व ५०० रु. चा स्टॅम्प पेपर ७००-८०० रु. विकले जात आहेत. या प्रकरणाकडे तहसील कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे कि ते ही या काळाबाजारीत सामिल आहेत असा संशय घेण्यात येत आहे. तहसील कार्यालयात स्टॅम्प पेपरचा काळाबाजार थांबविण्याची मागणी कांग्रेसचे महाराष्टÑ प्रदेश सरचिटणीस प्रणव लक्ष्मणराव रागीट यांनी एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे केली आहे.