Home इतर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे निशुल्क अपघात विमा वाटप वितरण

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे निशुल्क अपघात विमा वाटप वितरण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10261*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

188 views
0

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे निशुल्क अपघात विमा वाटप वितरण

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : नागपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने दि. 14 जून रोजी मराठी हृदयसम्राट मा.राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा अध्यक्ष सचिन धोटे तसेच ऑटो युनियनचे अध्यक्ष नरेंद्र मिश्रा यांनी आज निशुल्क अपघात विमा वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. शहरातील ऑटोचालक व मालकासाठी वार्षिक दोन लाख रुपयाची विमा कवच प्रदान करण्यात आले. जवळपास शंभर मालकांचा दोन करोड रुपयांचा विमा उतरविण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या मोलाचे मार्गदर्शन लाभले. वाहतूक दारांच्या तक्रारीचे निवारण अविरतपणे वाहतूक सेना करीत राहील. अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष सचिन धोटे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी शहराध्यक्ष अजय ढोके, मंगेश शिंदे उपशहर अध्यक्ष, प्रशांत निकम, गजानन टिपले, योगेश चौरसिया , लालचंद मिश्रा , दुबेजी , शुक्लाजी , पप्पू मिश्रा, देवेंद्र प्रभुदास डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश भोयर , युवराज, चाँद भाई , पवन शाहु तसेच शेकोडो ऑटो चालक व वाहतूकदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नरेंद्र यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या विपिन धोटे देवेंद्र जैन व अजय मोडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.