आशांचा राजव्यापी संप दुसऱ्या दिवसी सुरुच

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10256*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

239

आशांचा राजव्यापी संप दुसऱ्या दिवसी सुरुच

आशा सेविकांचे आंदोलन सुरूच राहणार ..

विदर्भ वतन, नागपूर : कोरोना कार्यकाळात हजारों आशा सेविकांनी मंगळवापासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. सार्वत्रिक लसीकरण व अन्य अत्यावश्यक कार्यात सेवा देत असणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिलावर्गाचे मानधन व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिलांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटना नागपूर सीटूच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सुद्धा मुंबईच्या बैठीकीत निवेदन दिले होते. नागपूर येथील संविधान चौकात याधरणे आंदोलनात मुसळधार पावसात आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटना नागपूर अध्यक्ष क्रॉ. राजेंद्र साठे, महासचिव प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, पौर्णिमा पाटील, अंजु चोपडे, मंगला बागडे यांचे नेतृत्वात धरणे आंदोलन केले. कोरोना काळात केलेल्या कामाचा वाढीव मोबदला देण्याची मागणीही केली आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत बेमुदत संप चालूच राहणार. कोरोना काळात रुग्णांसाठी काम करून राज्य सरकारने आशा वर्करांना फुटकी कवडीही दिली नाही. असा संताप आशा वर्कर यांनी केलेला आहे. असे अध्यक्ष राजेंद्र साठे आणि प्रिती मेश्राम यांनी म्हटले आहे.