कविता – अदमास

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10252*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

237

कविता – अदमास

आता उघड नयन
मायबापा पांडुरंगा
कलियुगी चाललेला
माणसांचा नाच नंगा

माणसाने माणुसकी
अशी टाकली गहाण
मायबहिणही झाली
पायामधली वहाण

झाला पिसाट माणूस
गुरांहुनही मोकाट
सांजसकाळी धावतो
पैशामागुनी सुसाट

हरवले जीवनाचे
अवघे नीती -नियम
जो तो आपापला येथे
रीत जपती कायम

तुझ्या नामाचा गजर
कोंडलेला गाभाऱ्यात
मोल तुझेही लावतो
टक्क्यांच्या बाजारात

असा कसा तू बघतो
दुजाभाव अत्याचार
किती युगे ठेवशील
असे कर कटीवर

झाली गरिबांची दैना
वासनेचा धुडगूस
तुज लागेना कसा रे….
संकटाचा ‘अदमास’

डॉ.वर्षा गंगणे
देवरी, गोंदिया
9422134807