Home Breaking News दारू तस्करीतील कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

दारू तस्करीतील कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10246*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

123 views
0

दारू तस्करीतील कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

विदर्भ वतन, भिवापूर : तालुक्यातील सालेभट्टी (चोर) येथील दुकानातून चंद्रपूर जिल्ह्यात नेली जात असलेली दारू स्थानिक गुन्हे शाखेच्या चमुने मोठया शिताफीने पकडून एका आरोपीसह एकूण ६ लाख ३५ हजार २00 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदर कार्रवाई सोमवारी (१५ जून) रात्री बाराच्या सुमारास उमरेड भिसी मार्गावरील उखळी फाटा परिसरात करण्यात आली. अमर बबनराव सुकारे (वय २७, झांसी राणी चौक, भिवापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची चमु सोमवारी तालुक्यात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खब-याकडून सालेभट्टी (चोर) येथील देशी दारू दुकानामधून चंद्रपूर जिल्ह्यात मोठया प्रमाणात दारू नेली जात असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारावर उमरेड भिसी मार्गावरील उखळी फाटा परिसरात नाकाबंदी करण्यात आली.
रात्री बारा वाजताच्या सुमारास भिसीच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या टाटा सुमो ( क्रमांक एम. एच. ४0 / ए. एफ. 0२६) वर संशय आल्याने गुन्हे शाखेच्या चमुने तिला थांबवून झडती घेतली. त्यात देशी दारूच्या ७0 पेट्या भरलेल्या आढळून आल्यात. पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेत चालक अमर सुकारे याला अटक केली.
जप्त केलेली दारू ही सालेभट्टी येथील देशी दारू दुकानातील असल्याची कबुली चालक सुकारे याने दिली. सदर दारू भिसी येथील आकाश पाटील या अवैध दारू विक्रेत्याला देण्यासाठी नेली जात असल्याचेही त्याने सांगितल्याचे समजते. त्याच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, भिवापूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
सदर कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक जितेंद्र वैरागडे, हे. काँ. रमेश भोयर, मदन आसटकर, राधेशाम कांबळे, साहेबराव बहाले यांनी पार पाडली.