Home Breaking News चिंताजनक! राज्यातील म्युकरमायकोसिस बाधितांच्या संख्येत वाढचिंताजनक! राज्यातील म्युकरमायकोसिस बाधितांच्या संख्येत वाढ

चिंताजनक! राज्यातील म्युकरमायकोसिस बाधितांच्या संख्येत वाढचिंताजनक! राज्यातील म्युकरमायकोसिस बाधितांच्या संख्येत वाढ

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10236*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

76 views
0

चिंताजनक! राज्यातील म्युकरमायकोसिस बाधितांच्या संख्येत वाढ

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई : महाराष्ट्राला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला. त्यानंतर आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसून येत असून राज्यातील कोरोबाधितांच्या संख्येत घट दिसून येत आहे. एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्यते घट होत असतानाच दुसरीकडे म्युकरमायकोसिस बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचबरोबर मृत्यूंचा आकडाही वाढल्याची नोंद करण्यात आली आहे.

सध्याच्या परिस्थितीत राज्यभरात 7395 रूग्ण असून 644 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर राज्यात म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर 9 टक्क्यांवर आहे. यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईत असल्याची माहिती आहे. गेल्या महिन्याभराची आकडेवारी पाहिली, तर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या सुमारे 80 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचप्रमाणे मृतांच्या संख्येतही 83 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून म्युकरमायकोसिसच्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी मे महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये 1487 म्युकरमायकोसिसच्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये 107 रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र जूनच्या मध्यापर्यंत रूग्णसंख्येच्या आलेखामध्ये 7 पटीने वाढ झाली आहे. दरम्यान राज्यामध्ये म्युकरमायकोसिसचे 30 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. राज्यातील एकूण 7395 रूग्णांपैकी 2212 रूग्ण बरे झाले आहेत. तर 4463 रूग्णांवर सध्या राज्यामध्ये उपचार सुरु आहेत.