पांढऱ्या, काळ्या, पिवळ्या बुरशीनंतर आता हिरव्या बुरशीचा संसर्ग, ‘या’ शहरांत सापडला पहिला रुग्ण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10226*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

247

पांढऱ्या, काळ्या, पिवळ्या बुरशीनंतर आता हिरव्या बुरशीचा संसर्ग, ‘या’ शहरांत सापडला पहिला रुग्ण

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : इंदूर – पांढऱ्या, काळ्या आणि पिवळ्या बुरशीनंतर आता देशात हिरव्या बुरशीचा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे. मध्य प्रदेशातील इंदूर शहरांत हिरव्या बुरशीच्या रुग्णाचे निदान झाले आहे.  देशातील ही पहिली घटना आहे.

कोरोनाच्या संसर्गातून बरे झाल्यावर रुग्णांना विविध बुरशीच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यातच इंदूर शहरांत विविध बुरशीचा संसर्ग वाढत गेल्याचं समोर आलं. आता पुन्हा एकदा नव्या बुरशीचा संसर्ग समोर आला आहे. 90 दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाला हिरव्या बुरशीची बाधा झाली आहे.

फुफ्फुसात हिरव्या बुरशीचे निदान

आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. अपूर्व तिवारी यांनी सांगितलं की , वैद्यकीय आणि आरोग्य विभागाला इंदूरच्या अरबिंदो रुग्णालयाकडून अहवाल मिळाला आहे. ज्यात तज्ज्ञ डॉ. रवी दोशी यांनी सांगितले की, 34 वर्षीय विशाल श्रीधर हे दीड महिन्यापासून अरबिंदो रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु त्यांचे 90 टक्के फुफ्फुस निकामे झाले होते. त्याच्यावर सर्व शक्य उपचार केले जात होते. जेव्हा त्याच्या फुफ्फुसांची तपासणी अरबिंदो हॉस्पिटलमध्ये केली गेली तेव्हा असे आढळले की रुग्णाच्या फुफ्फुसात हिरवी बुरशी आहे. ज्याला म्युकर म्हणता येणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं.

हिरव्या रंगामुळे या बुरशीला ग्रीन फंगस असे नाव देण्यात आले आहे. डॉ अपूर्व म्हणाले की, देशातील ही पहिली घटना आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसात हिरवी बुरशी आढळली आहे. विशाल श्रीधर नावाच्या रुग्णाला खासगी चार्टर्ड प्लेनमधून मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये रेफर केले गेले आहे. डॉ. रवी दोशी मुंबईच्या डॉक्टरांशी सतत संपर्कात राहून रुग्णाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

दुसरीकडे, रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या अरबिंदो रुग्णालयाचे डॉ. रवी दोशी यांनी सांगितले की, हिरवी बुरशी रुग्णाच्या सायनसमध्ये फुफ्फुसात रक्तामध्ये आढळली आहे. कोविडचा रुग्ण असल्याने त्याच्या फुफ्फुसाचे आधीच नुकसान झाले होते.

डॉ.  रवी दोशी पुढे म्हणाले की, एस्परगिलसच्या लक्षणांबद्दल बोलायचे तर नाकातून रक्तस्त्राव होणे, नाक बंद होणे, सर्दी, डोकेदुखी आणि ताप यासारखी अनेक लक्षणे आढळतात. कोरोना उपचारादरम्यानची ही पहिली घटना ज्यामध्ये अशी लक्षणे समोर आली आहेत. हे कोरोना आणि म्यूकरमाकोसिस एवढेच घातक आहे. यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असे म्हटले होते की कोणत्याही रंगाच्या नावाने बुरशीला ओळखले जाऊ नये.