शिवसेना भवनावरील राड्यावरून श्रद्धा जाधव यांच्यासह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10222*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

211

शिवसेना भवनावरील राड्यावरून श्रद्धा जाधव यांच्यासह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – राम मंदिराच्या मुद्द्यावरून आज शिवसेना भवनावर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून आता शिवसेनेच्या माजी महापौरी श्रद्धा जाधव यांच्यासह ७ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी अक्षता तेंडुलकर यांनी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही तर सोनियांची सेना झाली, अशी टीका केलीय.

भाजपच्या महिला पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांच्यावर आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हात उगारला असा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार माहिम पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात माजी महापौर श्रद्धा जाधव, राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू झगडे, राकेश देशमुख आणि शकी फडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलन संपल्यानंतर आम्ही परत निघालो असताना काही शिवसैनिकांनी मागून येऊन हल्ला केला. आमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्या सांगण्यावरुन शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप अक्षता तेंडुलकर यांनी केलाय.

शिवसैनिकांनी पाठीमागून हल्ला केला

आंदोलन संपल्यानंतर आम्ही चौघे पार्किंगला लावलेली गाडी काढण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी काही शिवसैनिकांनी आमच्यावर मागून येऊन हल्ला केला. आम्हाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाणीच्या वेळी श्रद्धा जाधव तिथे पोहोचल्या. त्यांनी शिवसैनिकापेक्षा आधी महिला म्हणून माझा विचार केला पाहिजे होतो. त्यांनी आम्हाला होणारी मारहाण रोखली पाहिजे होती, अशा शब्दात अक्षता तेंडुलकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

कोण आहेत अक्षता तेंडुलकर?

अक्षता तेंडुलकर या भाजपच्या माहिम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षा आहेत. त्यांची गेल्या वर्षी माहिम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी या परिसरात अनेक सामाजिक कार्य केले. भाजप माहिम महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या कामाचा धडाका पाहून त्यांची माहिम विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली.