गोसेखुर्द प्रकल्प बाधित पुनर्वसन गावातील अपूर्ण नागरी सुविधांचा आमदार राजूभाऊ पारवे यांनी घेतला आढावा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10217*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

200

गोसेखुर्द प्रकल्प बाधित पुनर्वसन गावातील अपूर्ण नागरी सुविधांचा आमदार राजूभाऊ पारवे यांनी घेतला आढावा

जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली बैठक

विदर्भ वतन, नागपूर :  मंगळवारला जिल्हाधिकारी कार्यालय येथे गोसे खुर्द प्रकल्पबाधित कुही, भिवापूर तालुक्यातील पुनर्वसित गावातील अपूर्ण नागरी सुविधांबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेण्यात आली. त्यावेळी तालुक्यातील पुनर्वसित प्रत्येक गावांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामध्ये गोन्हा, तुडका, फेगड, गोठणंगाव,राजोली,जीवनापूर,सोनेगाव,तारोली,म्हसली, अंभोरा, हरदोली, आवरमारा,बोरीनाई, इत्यादि सर्व गावातील भूसंपादन , डांबरी रस्ते, पाण्यामुळे खराब झालेले रस्ते,पाईपलाईन दुरुस्ती, नवीन प्लाट धारकांन करीत रस्ता,नवीन इलेक्ट्रिक पोल, पिण्याचे पाणी,बालसंगोपन केंद्र,स्मशानभूमी बांधकाम,सोलर लाईट या सर्व सविस्तर समस्या जाणून घेतल्या व तसेच किरकोळ कामे व नवीन कामाचे प्रकालन तयार करण्याकरिता ७ दिवसांची मुदत देऊन सर्व संबंधित विदर्भ सिंचन विकास महामंडळ चे अधिकारी यांना निर्देश देण्यात आले.
त्यावेळी मा.राजू पारवे आमदार उमरेड विधानसभा क्षेत्र, मा.रवींद्र ठाकरे जिल्हाधिकारी नागपूर, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,विदर्भ सिंचन विकास महामंडळ चे अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, व इतर सर्व संबंधित अधिकारी व गावातील नागरिक गण उपस्थित होते.