अपघातात जख्मी कुत्र्याचे उपचार करून रागीट बंधुंनी दिली पशुप्रेमाची शिकवण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10213*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

250

अपघातात जख्मी कुत्र्याचे उपचार करून रागीट बंधुंनी दिली पशुप्रेमाची शिकवण

विदर्भ वतन, नागपूर : मंगळवारी सायंकाळी 6:30-7 च्या सुमारास सोमलवाड़ा कांजी हाउस चौकात टेम्पो क्र. एमएच 31 एफसी 2018 च्या वाहन चालकाने आपले वाहन हयगयीने चालवून एका कुत्र्याच्या पिल्याला जख्मी केले. या अपघातात कुत्र्याला जबर मार लागला असून त्याचा एक पाय मोडला. अपघाताची माहिती मिळताच प्रणव लक्ष्मण रागीट व त्यांचे बंधू उत्तम लक्ष्मण रागीट दोघांनी त्या पिल्याला घरी आणले. त्याच्यावर प्रथमोपचार केले. त्याला एक वेदनानाशक गोळी पण दिली. अपघातात जख्मी झालेल्या कुत्र्याच्या पिल्ल्याचे सेवा करून रागीट बंधुंनी पशुपे्रमाची जगाला शिकवण दिली.