Home Breaking News मोबाइल पोर्न साइटने बिघडविली लोकांची मानसिकता, विनयभंगाच्या रोजच समोर येत आहेत घटना

मोबाइल पोर्न साइटने बिघडविली लोकांची मानसिकता, विनयभंगाच्या रोजच समोर येत आहेत घटना

0
मोबाइल पोर्न साइटने बिघडविली लोकांची मानसिकता, विनयभंगाच्या रोजच समोर येत आहेत घटना

मोबाइल पोर्न साइटने बिघडविली लोकांची मानसिकता, विनयभंगाच्या रोजच समोर येत आहेत घटना

विदर्भ वतन, नागपूर : मोबाइलमध्ये पोर्नसाइट सहज उपलब्ध आहेत. यामध्ये नात्याची पर्वा न करता कुणी-कुणासोबतही अश्लील कृत्य करत असल्याचे चित्रीकरण असते. अशा वीडियो क्लीपलाचा अनुसरण आंबट शौकीन करत आहेत. त्यामुळे विनयभंग व बलात्काराने प्रमाण वाढले आहे. होत आहे. शहरात विनयभंगाच्या गुन्ह्यात सातत्याने वाढ होत चालली आहे. तहसील आणि हुडकेश्वर हद्दीत शेजा-यांनी दोघींचा विनयभंग केला. तर गिट्टीखदान हद्दीत बापाने स्वत:च्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, गिट्टीखदान हद्दीत राहणारा आरोपी हा टेलर आहे. तो त्याची पत्नी, २ मुली आणि २ मुलांसोबत राहतो. त्याची पत्नीही घरकाम करते. काही दिवसांपासून तो त्याच्या १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करीत होता. तिने याबाबत तिच्या आईला तक्रार केली होती. मात्र, आईने त्या तक्रारीची दखल घेतली नाही. २५ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास मुलीची आईने झोपली असल्याचे नाटक केले. पत्नी झोपली असल्याचे पाहून आरोपीने स्वत:च्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेवढात त्याच्या पत्नीने त्याला अडविले. या घटनेमुळे घरात गोंधळ माजल्याने आरोपी पळून गेला. त्यानंतर १३ जूनला सकाळी ९ वाजताच्या सुमारास तो त्याच्या पत्नीला कुठे उभा असलेला दिसले. तिने तेथे त्याला जाब विचारला असता त्याने पत्नीला अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
दुस-या घटनेत अल्पवयीन मुलाने २२ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याची गटना समोर आली आहे. तहसील हद्दीत राहणारी २२ वर्षीय युवती आंघोळ करीत असताना जवळच राहणा-या अल्पवयीन मुलाने युवतीचे आंघोळ करताना व्हिडीओ काढून त्यावरून स्क्रीन शॉटने फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर अपलोड करून मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी मिळालेल्या तक्रारीवरून तहसील पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिस-या घटनेत हुडकेश्वर हद्दीत राहणारी २५ वर्षीय युवती तिच्या घरी असताना १४ जूनला दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास तिच्या घरासमोर राहणारा आरोपी विलास चंद्रभान नारनवरे (३५) हा तिच्या घरात घुसून आला आणि त्याने युवतीचा विनयभंग केला. याप्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्?वर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.