Home इतर असोसिएशन आॅफ प्रोग्रेसिव्ह एम्पलॉइज इंडिया- एपीईआय नागपूर तर्फे होतकरू विद्यार्थ्याला शैक्षणिक मदत

असोसिएशन आॅफ प्रोग्रेसिव्ह एम्पलॉइज इंडिया- एपीईआय नागपूर तर्फे होतकरू विद्यार्थ्याला शैक्षणिक मदत

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10203*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

128 views
0

असोसिएशन आॅफ प्रोग्रेसिव्ह एम्पलॉइज इंडिया- एपीईआय नागपूर तर्फे होतकरू विद्यार्थ्याला शैक्षणिक मदत

विदर्भ वतन, नागपूर : असोसिएशन आॅफ प्रोग्रेसिव्ह एम्पलॉइज इंडिया- एपीईआय या देशव्यापी पुरोगामी विचारांच्या कर्मचा-याच्या संघटनेनेच्या नागपूर शाखेने रहाटे नगर, टोली झोपडपट्टी नागपूर येथील अविजीत हातागडे या होतकरू आणि अभ्यासू विद्यार्थ्यास 10 हजार रुपयाचा धनादेश देऊन त्याच्या शैक्षणिक वाटचालीत मदत केली आहे.अर्जुन हातागडे हे अविजितचे वडील असून ते आॅटो रिक्षा चालवून आपल्या 2 मुले व 2 मुलींना डॉक्टर इंजिनिअर बनविण्याचा स्वप्न पाहत होते. पण दीड वषार्पूर्वी त्यांना ब्रेन कॅन्सर ने ग्रासले व त्यांतच त्यांची दृष्टी गेली. त्यामुळे त्यांचा उदरनिवार्हाचे साधनच थांबले. त्यांचा मोठा मुलगा अविजित अभ्यासात हुशार, त्याला वडिलांनी एका नामांकीत इंग्लिश स्कूल मध्ये टाकलं होतं व यावर्षी तो दहावीला असतांना शाळेच्या शुल्काचा कसं होणार? हा प्रश्न त्यांना पडला. पायाचा अपघात झालेल्या अविजीतची आईने कष्टाने संसाराचा गाडा चालवला आहे.
दरम्यान, टोळी झोपडपट्टीत काही वर्षयापासून मुलां मुलींचा अभ्यास करून घेणारे समाजसेवी खुशाल ढाक ह्यांनी नागपुरात ‘पे बॅक टू सोसायटी’ या ध्येयाने काम करना-या असोसिएशन आॅफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईस इंडिया ह्या संघटने कडून काही महिन्यांपूर्वी वस्तीत 40 विद्यार्थ्यांना खेळाचे गणवेश (स्पोर्टसवेअर) मिळवून दिले होते. त्याच वेळी वस्तीला भेट देणारे एपीआयईचे डॉ किशोर मानकर, डॉ.भावना वानखडे, प्रा. विलास तेलगोटे ह्याच्यासमोर अविजित ह्या होतकरू मुलाची व्यथा मांडण्यात आली. दरम्यान कोविड-19 च्या दुस-या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र परिस्थिती थोडी सामान्य होताच संघटनेच्या कु. भावना जनबंधु ह्यांनी अविजित व त्याचे वडील अर्जुन ह्यांची वस्तीत जाऊन भेट घेऊन अविजितच्या शालेय फी साठी 10,000 रुपये चा धनादेश त्यांना सुपूर्द केला. एपीआयई या संघटनेद्वारे मिळालेल्या मदतीमुळे मी चांगला अभ्यास करून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करील असा आत्मविश्वास अविजित ने व्यक्त केला. अविजितची अभ्यासातील प्रगती पाहून ह्यापुढे सुद्धा संघटना अविजितिच्या पाठीशी उभी राहील असे आश्वासन डॉ. किशोर मानकर यांनी दिले आहे.