Home Breaking News मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्त्वात आज कोल्हापुरात मूक आंदोलन

मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्त्वात आज कोल्हापुरात मूक आंदोलन

0
मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्त्वात आज कोल्हापुरात मूक आंदोलन

मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्त्वात आज कोल्हापुरात मूक आंदोलन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : कोल्हापूर – खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली होती. 6 जून रोजी रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. येत्या 16 जूनपासून कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले होते. त्यानुसार आजपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक आंदोलनाची सुरुवात होणार आहे. आज सकाळी 11 वाजता शाहू महाराजांच्या समाधी स्थळी या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी दिलेल्या हाकेला प्रकाश आंबेडकर यांनी साद दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कोल्हापुरातील मूक आंदोलनात सहभागी होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात पाच जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार असून आज कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी मौन बाळगून तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करून हे आंदोलन करायचे आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा संसंर्ग वाढेल असे कोणतेही कृत्य करायचे नाही, अशा सूचनाही आंदोलकांना देण्यात आलेल्या आहेत.

Sharing is caring!