पश्चिम नागपुरातील विविध युवकांचा मनसेत प्रवेश

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10181*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

225

पश्चिम नागपुरातील विविध युवकांचा मनसेत प्रवेश

विदर्भ वतन, नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नागपूर येथील पश्चिम विधानसभा क्षेत्र, प्रभाग १४, फुटाळा परिसर येथे अनेक युवकांनी मा. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसेत प्रवेश केला. मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या धरमपेठ येथील पक्ष कार्यालयात सर्व युवकांनी पक्षाचा ध्वज आणि दुपट्टे देऊन हेमंत गडकरी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने शहर अध्यक्ष अजय ढोके, जिल्हा सचिव मनोज गुप्ता, पश्चिम विभाग अध्यक्ष चंदू लाडे, विभाग सचिव पराग विरखरे, संजय पळसकर उपस्थित होते. प्रवेश घेणा-या सर्व युवकांनी सभासद अर्ज भरून मनसेचे सभासदत्व स्वीकारले. मा. राजसाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले कार्य आपल्या विभागात प्रामाणिकपणे करा व जनतेची कामे करा, मनसे तुमच्या पाठीशी आहे. असे शहर अध्यक्ष अजय ढोकेनी सर्व नवीन सदस्यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये सहभागी यशवंत कोकाडे, कार्तिक अस्वले, साहिल धोत्रे, अर्चित झंझाड, मनोज आंबोने, निखिल वासनिक, वेदांत काळे, समीर डरदेमल यांचेसह अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला. ही माहिती शाम पूनियानी, शहर सचिव, मनसे, नागपूर यांनी दिली.