
निसर्गनियम
पक्ष्यांची गगनभरारी बघून वाटतं
त्यांच्याप्रमाणे आपणही उडावे
निरभ्र आकाशाचे निरनिराळे रंग
सर्वांगात अगदी शोषून घ्यावे
नासाडी न करता निसर्ग देवाची
त्याने दिलेले मनःपूर्वक जपावे
कृत्रिमता कमी व्हावी जगतात
सर्वकाही निसर्गनियमाने घडावे
तेच ते रटाळ जगणे मागे सोडून
स्वच्छंदपणे हसावे,रडावे,बागडावे
जे ही बरे वाईट मिळाले आपल्याला
कुरबुर न करता मनःपूर्वक स्वीकारावे
चूक बरोबर जे ही घडले हातून
ते स्वतःचेच स्वतःला नीट कळावे
अंधार दूर करण्यासाठी सभोवतीचा
दिव्याच्या ज्योती प्रमाणे सतत जळावे
स्वप्ना अनिल वानखडे
वर्धा

