मनपाद्वारे शहरातील विविध भागात डास प्रतिबंधक औषधाची फवारणी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10153*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

225

मनपाद्वारे शहरातील विविध भागात डास प्रतिबंधक औषधाची फवारणी

डासांची पैदास रोखण्यासाठी कूलरच्या टाक्यांमध्ये ‘अबेट द्रावण’

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर – पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू तापावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून चंद्रपूर शहर  महानगरपालिकेतर्फे डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात येत आहे. तसेच डेंग्यू आणि मलेरिया आजारापासून बचाव करण्यासाठी नागरिकांच्या घरी असलेल्या कूलरच्या टाक्यांमध्ये ‘अबेट द्रावण’ टाकण्यात येत आहे.  
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे  सोमवारी (ता. १४) विवेकनगर प्रभाग क्र. ५ मध्ये रहिवासी क्षेत्र पं. दिनदयाळ उपाध्याय मनपा शाळा, महाराष्ट्र बँक, गादी कारखाना, अर्जुन क्लाॅथ स्टोअर्स, जय हिंद चौक, एकता चौक, हनुमान मंदिर, साळवे कॉलनी, शिवाजी चौक, दांडीया ग्राउंड, गुरुकुल गृहनिर्माण सोसायटी, गोपाल नगर, कृष्णा टॉवर्स या परिसरात डास प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत औषध फवारणी तसेच कुलर्सच्या पाण्याच्या टाकीत अबेट द्रावण टाकण्याची कार्यवाही करण्यात आली.
तसेच झोन क्र. १ (ब) मध्ये आणि झोन क्र. 3 (ब) अंतर्गत प्रकाश नगर येथील भागात डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात आली.
पावसाळ्यानंतर डेंग्यूचा प्रभाव वाढतो पावसाळ्यात आणि त्याच्या नंतरच्या महिन्यात म्हणजेच जुलै ते ऑक्टोबरमध्ये डेंग्यू सगळ्यात जास्त पसरतो. कारण या ऋतूमध्ये डासांची पैदास वाढण्याची शक्यता असते. एडीस इजिप्ती डासाला खूप उंचावर उडता येत नाही आणि डेंग्यूचा मच्छर सकाळी चावतो. चावल्याच्या ३ ते ५ दिवसांनंतर रुग्णांमध्ये डेंग्यूच्या तापाची लक्षणे दिसण्यास सुरवात होते. शरीरात ही बाधा होण्यासाठी मर्यादा ३ ते १० दिवसांची पण असू शकते. त्यामुळे आतापासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

 पावसाळ्याच्या दिवसात या गोष्टींवर लक्ष ठेवा

– डेंग्यूचे मच्छर साचलेल्या पाण्यात होतात. म्हणुन घरात आणि आजुबाजूच्या परिसरात पाणी साचू देऊ नका.
– कूलरमध्ये असलेले पाणी २ ते ३ दिवसांमध्ये नक्की बदला.
– घराच्या आजूबाजूच्या नाल्यांमध्ये एंटी लार्वाचा फवारा मारा.
– घरात लादी पुसणाऱ्या पाण्यात केरोसिन किंवा फिनायल टाकून लादी पुसा.
– जेव्हा घरातून निघाल, तेव्हा पुर्ण बाह्यांचे कपडे घाला, शॉर्ट्स घालण्याचे टाळा.
– मच्छर गडद रंगाकडे आकर्षित होतात म्हणून फिकट रंगाचे कपडे घाला.
– गडद सुगंधाचे फर्म्यूम टाळा, कारण मच्छर स्ट्रॉन्ग स्मेलकडे आकर्षित होतात
– झोपण्याच्या आधी हात-पाय आणि शरिराच्या उघड्या अंगावर व्हिक्स लावा. त्यामुळे मच्छर जवळ येणार नाहीत
– तुळशीचे तेल, पुदिन्याच्या पानांचा रस, लसणाचा रस किंवा झेंडूच्या फुलांचा रस शरीरावर लावल्याने मच्छर तुमच्यापासून लांब राहतील