सरपंच पदाला फासली काळीमा, महिलेचा विनयभंग करून गमावली गरिमा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10148*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

189

सरपंच पदाला फासली काळीमा, महिलेचा विनयभंग करून गमावली गरिमा

– काचूरवाहीच्या सरपंचाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

विदर्भ वतन,रामटेक : रामटेक तालुक्यातील गजबजलेले तथा विविध राजकीय घडामोडींनी सक्रिय असलेल्या काचूरवाही ग्रामपंचायतच्या सरपंचाने सरपंचपदाला काळीमा फासत दुस-यांदा विनयभंग करण्याचा लाजीरवाणा प्रकार रविवारी, १३ जून केला. गावातीलच एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी सरपंचाविरोधात विविध गुन्हे नोंदवून त्याला अटक केली आहे.
पो. स्टे. रामटेक येथून मिळालेल्या माहितीनुसार, काचूरवाहीचे सरपंच व फिर्यादी महिला हे एकाच गावातील रहिवासी आहे. आरोपी सरपंच हा फिर्यादी महिलेच्या घरासमोर गेला व तिच्या पतीला त्याने घराबाहेर बोलावले व त्याचा हात पिरगळून तुझी बायको मद्रास्यासारखी दिसते, असे म्हटले. तेव्हा असे वाक्य ऐकताच फिर्यादी महिला घराबाहेर आली व तू माज्या पतीचा हात का पिरगळला व तू असे का करीत आहेस, असे म्हटले असता आरोपी सरपंचाने अश्लील शब्दात बोलून विनयभंग केला व जीवे मारण्याची धमकी दिली.
तेव्हा फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून आरोपी सरपंचावर कलम ३५४, २९४, ३२३, ५0४, ५0६ नुसार पो. हवालदार नीलेश बिजवाड यांनी गुन्हा नोंद केलेला असून, पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे व पीएसआय सीमा बेंद्रे करीत आहे.
सोमवारी कामठी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमक्ष आरोपी राऊत यांना हजर करण्यात आले होते. न्यायालयाने राऊत यांना मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.