Home Breaking News शेतक-याला लाच मागणे पडले महागात, महसूल सहाय्यकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

शेतक-याला लाच मागणे पडले महागात, महसूल सहाय्यकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10143*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

99 views
0

शेतक-याला लाच मागणे पडले महागात, महसूल सहाय्यकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

-सावनेर तहसील कार्यालयातील प्रकरण

विदर्भ वतन, नागपूर : शेतजमीन व्यवसायासाठी अकृषक करण्यासाठी सावनेर येथील तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाने ६0 हजारांची लाच मागितली. ती लाच रक्कम स्वीकारत असताना महसूल सहाय्यक आणि त्यांच्या मदतणीसास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. दोन्ही आरोपींविरुद्ध सावनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रकरणातील तक्रारदार हे बाबा फरीदनगर येथील रहिवासी आहेत. ते शेती व्यवसाय करतात. तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे मौजा कवडस तह. सावनेर येथे 0.५६ हेक्टर शेती आहे. त्यापैकी 0.१0 हेक्टर शेती जमीन व्यवसायासाठी अकृषक करण्याकरिता तक्रारदारच्या वडिलांनी तहसील कार्यालय सावनेर येथे रितसर अर्ज केला होता. दिलेल्या अर्जावर काय कारवाई करण्यात आली, त्यासंबंधाने तक्रारदार हे महसूल सहाय्यक राजेंद्र जीवन उबाळे (५२) आणि त्यांचे मदतनीस शुभम सुभाष साबळे (२३) यांना भेटले असता, त्यांनी तक्रारदारास 0.१0 हेक्टर शेतजमीन व्यवसायासाठी अकृषक करण्याकरिता ६0 हजारांची लाच मागितली. तक्रारदार यांना याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभाग नागपूर येथील कार्यालयात जाऊन राजेंद्र उबाळे आणि त्यांचे मदतनीस शुभम यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधिक्षक संदीप जगताप यांनी दिलेल्या तक्रारीची गोपनीय चौकशी करून सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये पडताळणीदरम्यान आरोपी महसूल सहाय्यक राजेंद्र उबाळे आणि शुभम साबळे यांनी तडजोडीअंती ५५ हजार रु. लाच रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध सावनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.