Home Breaking News आंघोळ करण्यासाठी बहिण-भाऊ नाल्यात उतरले,विपरीत घडले असे की त्यांचे प्रेतच बाहेर आले

आंघोळ करण्यासाठी बहिण-भाऊ नाल्यात उतरले,विपरीत घडले असे की त्यांचे प्रेतच बाहेर आले

0
आंघोळ करण्यासाठी बहिण-भाऊ नाल्यात उतरले,विपरीत घडले असे की त्यांचे प्रेतच बाहेर आले

आंघोळ करण्यासाठी बहिण-भाऊ नाल्यात उतरले,विपरीत घडले असे की त्यांचे प्रेतच बाहेर आले

– आमगाव (देवळी) येथील घटना,आई-वडिलांचे सर्वस्व हरपले

विदर्भ वतन,वानाडोंगरी : गावाशेजारच्या नाल्यावर खेळत असताना आंघोळ करायला पाण्यात उतरलेल्या दोघा बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमगाव (देवळी) या गावात घडली. या घटनेनंतर रविवारी गावात शोककळा पसरली आहे. आरुषी नामदेव राऊत (वय ११) व तिचा लहान भाऊ अभिषेक नामदेव राऊत (वय ७) रा. आमगाव (देवळी -सावंगी), ता. हिंगणा, जि. नागपूर अशी मृतकांची नावे आहे.
मृत बालकांचे आई-वडील हे शेतमजूर असून, रविवारी (१३ जून) गावाशेजारच्या नाल्यावर खेळत असताना आंघोळीसाठी पाण्यात उतरले. खोल पाण्यात गेल्यावर ते पाण्यात बुडाले. याची कुणालाही माहिती नव्हती. सायंकाळी त्यांचे आई-वडील घरी परतले असता दोन्ही मुले घरी नाहीत म्हणून शोध सुरू झाला. रात्रभर शोधून ते सापडले नाही. सोमवारी सकाळी पुन्हा गावक-यांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू झाला. तेव्हा गावशेजारी असलेल्या नाल्याच्या काठावर त्यांच्या चपला व कपडे दिसले. हिंगणा पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार सरीन दुर्गे दलबलासह घटनास्थळी पोहोचले. दोन तासानंतर पोलिसांनी देवळी व सावंगी या गावातील तरुणांच्या मदतीने दुपारी १च्या सुमारास दोन्हीही मृतदेह बाहेर काढले. हिंगणा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर दुपारी देवळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या मतदारसंघाचे आमदार समीर मेघे व जिल्हा परिषद महिला बाल कल्याण सभापती उज्ज्वला बोढारे यांनी घटनास्थळी पोहोचून कुटुंबीयांचे सांत्वन केले. वीटभट्टी कारखानदारांनी माती उपसा केल्यामुळे नाल्याच्या काठावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे त्या लहान मुलांना खोल पाण्याचा अंदाज आला नाही. खोल खड्डयात बुडून त्यांचा मृत्यू झाला. असे खड्डे खोदून माती नेणा-यांवर राजस्व विभागाचे लक्ष नाही, हे दुदैर्वी आहे. याला जबाबदार असलेल्यावर कार्रवाई करण्यात यावी, अशी मागणी महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे यांनी केली आहे. आई-वडिलांचे सर्वस्व हरपले असून, त्या मजूर कुटुंबात पती-पत्नी व दोनच मुले होती.