निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने मुलांवरच केला गोळीबार, एकाची प्रकृती चिंताजनक; बायकोलाही मारहाण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10125*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

226

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने मुलांवरच केला गोळीबार, एकाची प्रकृती चिंताजनक; बायकोलाही मारहाण

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :नवी मुंबई – एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मुलावरच गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील ऐरोली भागात घडला आहे. या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने आपल्या पत्नीलाही मारहाण केल्याची माहिती समोर आली असून गोळीबारमध्ये त्यांचा मुलगा विजय पाटील जखमी झालाय. तब्बल तीन गोळ्या लागल्यामुळे विजयची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या विजयवर ऐरोलीतील इंद्रावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर भगवान पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नवी मुंबईतील ऐरोली भागात भगवान पाटील नावाचे निवृत्त पोलीस अधिकारी राहतात. त्यांचा विजय पाटील हा मुलगा वसईला राहतो. तुला गिफ्ट द्यायचंय असं सांगून भगवान पाटील यांनी विजय पाटलीला घरी बोलावून घेतले. विजय पाटील घरी आल्यावर त्याच्यावर भगवान पाटील यांनी गोळ्या झाडल्या. तसेच, त्यांचा दुसरा मुलगा सुजय पाटील याच्यावरही गोळीबार करण्यात आला. यामध्ये विजयच्या पोटात एक आणि खांद्यावर एक गोळी लागली. तर एक गोळी हाताला घासून गेली. तर सुजयच्या अंगाला गोळी घासून गेली. तब्बल तीन गोळ्या लागल्यामुळे विजयची प्रकृती चिंताजनक आहे. यावेळी भगवान पाटील या निवृत्त अधिकाऱ्याने आपल्या पत्नालीसुद्धा मारहाण केली.

भगवान पाटील हे माजी नगरसेवक राजू पाटील यांचे नातेवाईक आहेत. भगवान पाटील यांनी याआधीही अशाच प्रकारचे कृत्य केलेले आहे. त्यांनी राजू पाटील यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखली होती. या प्रकारामुळे तक्रार दाखल केल्यानंतर भगवान पाटील यांच्याकडून रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली होती. मात्र, आता रिव्हॉल्वहर परत मिळाल्यानंतर भगवान पाटील यांनी आपल्याच मुलांवर गोळ्या झाडल्या आहेत. या प्रकारामुळे सध्या नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे.