Home आरोग्य संजीवनी संस्कार बहुद्देशीय संस्थेच्या वतीने गोरगरिबांना जेवण वाटप

संजीवनी संस्कार बहुद्देशीय संस्थेच्या वतीने गोरगरिबांना जेवण वाटप

0
संजीवनी संस्कार बहुद्देशीय संस्थेच्या वतीने गोरगरिबांना जेवण वाटप

संजीवनी संस्कार बहुद्देशीय संस्थेच्या वतीने गोरगरिबांना जेवण वाटप

विदर्भ वतन,नागपूर : संपूर्ण देशभरात कोरोना महामारी मुळे माणसाचं जीवन जगणं अस्तव्यस्त झाले असून नागपुरात गोर गरिबांना करिता अन्नदान करण्या करिता खालील चार संस्था समोर आलेले आहेत.
संजीवनी संस्कार बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत कम्युनिटी किचन याच्या तर्फे गेल्या 27 एप्रिल 2021 पासून नियमित सुरू आहे. आज जवळजवळ पंचेचाळीस दिवस झाले. गरिबांना जेवन वाटपच करत आहे. संस्थेच्या संस्थापक सुषमाताई कांबळे, ह्या स्वत: सकाळपासून स्वयंपाक बनविण्यापासून ते गरंजू व गरिब लेकांना भोजन वाटण्यापर्यंत जातीने लक्ष देतात. आणि खूप प्रेमाने सर्वांना जेवण कसे झाले विचारतात. त्यांच्या सात्विक जेवनामध्ये घरच्या जेवनाचा स्वाद असतो. त्यात वरण-भात-भाजी-पोळी आणि कधी कधी गोडपदार्थ पण असते. सुषमाताई नियमितपणे रोज ईन्होवा गाडीत दोन स्वयंसेवक विकी आणि राहुल ला घेऊन निघतात आणि जेव्हा पर्यंत त्यांच्या कडे अन्नाचा एक घास आहे. तो पर्यंत वाटतात. जेवण वाटपाचा ठरलेला मार्ग आहे. वधार्रोड वरील चिंचभवन पासून तर जयप्रकाश नगर, छत्रपती स्क्वेअर, साई मंदिर, अजनी चौक, लोकमत स्क्वेयर, बर्डी, महाराज बाग, रामनगर द्वार, संविधान चौक, मिठा नीम, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी, जे भिक्षा मागतात अशांना खूप प्रेमाने जेवण देतात. त्यांच्या मदतीला चार संस्था आल्यात, ज्ञानदीप शिक्षण संस्था च्या भावनाताई जनबंधू, पीपल टू पीपल सोसायटी नागपूर च्या अनुश्री व तेज धम्म, परिवर्तन फाउंडेशन जामठाचे योगेश टेकाम, सेवन स्टार फाऊन्डेशनच्या पूजा फुलझेले या सर्व संघटना एकत्रित येऊन गोर गरिबांना खूप मदत करत आहे. तसेच सुरुवातीला संजीवनी संस्कार बहुद्देशीय संस्थाच्या या उपक्रमाच्या सुरुवातीला सेकंड फेज किचन ची सुरुवात मिस्टर समीर लुतरा यांच्या मदतीने करण्यात आली आणि समीर प्रत्येक अडचणीच्या वेळेस समोर येऊन खूप मदत करतात. सर्वांनाच याची मदत होत आहे. त्यामुळे दान दाता यांचे या प्रसंगी खूप आभार व्यक्त करण्यात येत आहे.