शिकवणी वर्गांना 50% क्षमतेनुसार परवानगी द्या

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10115*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

167

शिकवणी वर्गांना 50% क्षमतेनुसार परवानगी द्या

– नागपूर खाजगी शिक्षक संघटनेची मागणी

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर – जून महिन्या पासून नागपूर जिल्हामध्ये अनलॉकिंग ची प्रक्रिया सुरू झाली  आहे. या प्रक्रियेमध्ये जवळजवळ सर्वच व्यापारी प्रतिष्ठान उघडे करण्यास परवानगी मिळाली आहे. परंतु जे सुशिक्षित बेरोजगार ,कोचिंग क्लासेस या व्यवसायामध्ये काम करतात त्यांना परवानगी मिळाली नाही, हे खूपच धक्कादायक आहे. जर सिनेमा हॉल मध्ये 50% क्षमता  ठेवून सिनेमा हॉल ला परवानगी मिळू शकते तर कोचिंग क्लासला सुद्धा 50% क्षमता ठेवून परवानगी मिळाली पाहिजे. एसटी बसला संपूर्ण क्षमतेसह परवानगी मिळाली, जीमला परवानगी मिळाली. जर यांना परवानगी मिळू शकते तर कोचिंग क्लासेसला 50  टक्के क्षमता ठेवून चालू  करण्यास परवानगी न देण्याचे काय कारण आहे?

 हा तर कोचिंग क्लासेस या व्यावसायसोबत  भेदभाव आहे. विद्यार्थ्यांच्या उज्वल यशामध्ये जेवढा शाळेचा वाटा आहे, तेवढाच वाटा कोचिंग क्लासेसचां सुद्धा असतो. कोचिंग क्लासेस चे शिक्षक  विद्यर्थ्यांवर मेहनत घेऊन, त्यांना उत्कृष्ट शिक्षण देऊन त्यांचे शैक्षणिक आलेख
उंचविण्याचा प्रयत्न करतात आणि हेच सुशिक्षित बेरोजगार पंधरा महिन्यापासून कोचिंग क्लासेस उघडण्याची वाट पाहत आहेत परंतु त्यांच्या पदरी या क्षणी ही निराशाच आली.
   मागील पंधरा महिन्यापासून कोचिंग क्लासेस बंद आहे आणि शिक्षक आर्थिक संकटांना तोंड देत आहे .  कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांनजवळ दुसरा कोणताही आर्थिक स्त्रोत्र नाही.
नागपूर जिल्ह्यातील हजारो   बेरोजगार झालेले आहेत . बऱ्याच शिक्षकांवर तर उपासमारीची पाळी आलेली आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करीत नाही.
 कोचिंग क्लासेस चे संचालक 18% जीएसटी भरतात.त्यामुळे कोचिंग क्लासेस ला सुद्धा एक व्यवसाय म्हणूनच पाहिले पाहिजे.सरकारने शाळा कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस यांना एकाच तराजूत तोलू नये, कारण की शाळा ,कॉलेजेस यांना ट्रस्ट चालवते त्यामुळे या ट्रस्ट ला सरकार मार्फत बऱ्याच अनुदान व टॅक्समध्ये सवलत मिळते परंतु कोचिंग क्लासेस असं नाही.
कोचिंग क्लासेस आपल्या विद्यार्थ्यांची खूप काळजी घेते कारण की कोचिंग क्लासेस वाले जेवढे विद्यार्थ्यांची काळजी घेतील तेवढेच  तेवढेच पालक त्यावर समाधानी होऊन त्या क्लासमध्ये ठेवतील, अन्यथा त्या क्लासमध्ये ठेवणार नाही.  Covid  च्या नियमावलीचे पालन करून, व्यवस्थित सामाजिक अंतर पाळून  50% क्षमते सह कोचिंग क्लासेस उघडण्यास परवानगी द्यावी.
       तसेच पाच लाख रुपये बिनव्याजी कर्ज द्यावे अशी मागणी नागपूर खाजगी शिक्षक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.याविषयीचे निवेदन माननीय महापौर दयाशंकर तिवारी मनपा नागपूर तसेच मनपा आयुक्त यांना देण्यात आले आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन गजभिये, सचिव दिलीप ठाकरे, कोषाध्यक्ष संजय बरडे,  आस्वर सर,वसीम सर, असावर सर,अमित सवाई सर, कोटांगळे सर, अंड्रसकर, आकाश गुप्ता ,विशाल ठाकूर, नाईक सर इत्यादी शिक्षक उपस्थित होते.